deepika ranveer 
मनोरंजन

लग्नाच्या चार वर्षांपूर्वीच दीपिका-रणवीरने गुपचूप उरकला होता साखरपुडा

स्वाती वेमूल

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता रणवीर सिंह व दीपिका पदुकोण. या दोघांची लव्हस्टोरी ते लग्नापर्यंतचा प्रवास सर्वश्रुत आहे. २०१२ मध्ये या दोघांची पहिल्यांदा भेट झाली आणि त्यानंतर सहा वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं. रणवीरने दीपिकाला लग्नासाठी प्रपोज तर केलं होतं, मात्र भूतकाळातील काही अनुभवांमुळे दीपिका लग्नाला होकार द्यायला कचरत होती. अखेर २०१८ मध्ये या दोघांनी लग्न केलं. इथपर्यंतची गोष्ट तर अनेकांना ठाऊक असेलच. पण तुम्हाला हे माहितीये का, की रणवीर-दीपिकाने लग्नाच्या चार वर्षांपूर्वीच साखरपुडा केला होता. रणवीरने दीपिकाला प्रपोज केल्याच्या दोन वर्षांनंतर या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला होता. 

याबाबतचा खुलासा खुद्द दीपिकाने 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत केला. "हे कोणालाच माहित नाही. लग्नाच्या चार वर्षांपूर्वीच आमचा साखरपुडा पार पडला होता. या कार्यक्रमाला दोघांचे पालक आणि भाऊ-बहीणच उपस्थित होते", असं सांगत दीपिकाने चाहत्यांना धक्काच दिला. या दोघांचा साखरपुडा जरी छोटेखानी समारंभात पार पडला असला तरी लग्न मात्र धूमधडाक्यात झालं. 

इटलीमध्ये कोकणी आणि सिंधी अशा दोन पद्धतींनी रणवीर-दीपिकाचा विवाहसोहळा पार पडला. या दोघांनी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'रामलीला' आणि 'पद्मावत' या चित्रपटांमध्ये काम केलं. 'रामलीला'च्या सेटवरच या दोघांमध्ये प्रेमाची कळी फुलत होती. आता लग्नानंतर ही दोघं पुन्हा एकदा '८३' या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात हे दोघं ऑनस्क्रीनसुद्धा पती-पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: भारताच्या माजी क्रिकेटरचे रोहित पवारांवर गंभीर आरोप, क्रिकेट जगतात खळबळ! नेमकं प्रकरण काय?

सुधा चंद्रन यांच्या अंगात खरंच देवी आलेली की, नाटक होतं? खरं कारण आलं समोर

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा तालिब एन्काउंटरमध्ये ठार! UP पोलीसांची कारवाई, असा घडला चकमकीचा थरार

Gold Rate Today : नवीन वर्षात सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदी महाग! सर्वसामान्यांना झटका, गुंतवणूकदार खुश; आजचे ताजे भाव पाहा

ताडोबातील खाण प्रकल्पाला अखेर मंजुरी; राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांचा विरोध डावलत सरकारचा निर्णय...

SCROLL FOR NEXT