Deepika Bikini esakal
मनोरंजन

Deepika Bikini: दीपिकाची 'भगवी' बिकीनी तयार केली, शालीनची 'लॉटरीच' लागली! आता...

पठाणमधील बेशरम रंग पाहिलं नाही असं कुणी सापडणं आता अवघड आहे. असं चित्र आहे.

सकाळ डिजिटल टीम

Deepika Padukone Bollywood actress bikini dress style shaleena nathani: पठाणमधील बेशरम रंग पाहिलं नाही असं कुणी सापडणं आता अवघड आहे. असं चित्र आहे. सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चाही सुरु आहे. आता तर अयोध्येतील संत परमहंसदास यांनी शाहरुखला जिवंत जाळण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात पठाणचा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पठाण आणि त्या चित्रपटातील बेशरम गाणे याच्याशी संबंधित जोरदार वाद सुरु झाला आहे. पठाणमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ही मुख्य भूमिकेत आहे. दीपिकानं परिधान केलेली भगव्या रंगातील बिकीनी ही तर अनेकांच्या डोळ्यात खुपली आहे. त्यावरुनं हिंदू महासभा आक्रमक झाली आहे. तिकडे मध्यप्रदेशमध्ये नरोत्तम मिश्रा यांनी काहीही झालं तरी पठाण हा प्रदर्शित होऊ देणार नाही असे म्हटले आहे. काही मुस्लिम संघटनांनी देखील त्यावर आक्षेप नोंदवला आहे.

Also Read- असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

मात्र यासगळ्यात चाहत्यांनी शाहरुखच्या त्या चित्रपटातील गाण्याचे कौतूक केले आहे. एकतर तब्बल चार वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर शाहरुखचा पठाण हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अशावेळी जगभर शाहरुखचा असलेला फॅन फॉलोअर्स लक्षात घेता पठाण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याचे म्हटले जात आहे. यासगळ्यात आणखी एका व्यक्तीला लाईमलाईटमध्ये येण्याची मोठी संधी मिळाली आहे.

दीपिकाची बिकीनी डिझाईन करण्याचे काम प्रसिद्ध स्टायलिस्ट शालिन नथानीनं केलं आहे. जशी दीपिकाची बिकीनी चर्चेत आली तशी शालिनच्या नावाची चर्चा व्हायला लागली आहे. तिची तर लॉटरीच लागली आहे. त्यानंतर बॉलीवूडच्या आगामी मोठमोठया प्रोजेक्टमध्ये देखील शालिनची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. दीपिकाला भलताच बोल्ड टच देणाऱ्या शालिनच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतूक होताना दिसत आहे. स्वता शालिन देखील ही कमालीची बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT