deepika ranveer 
मनोरंजन

रणवीर सिंहचा एनसीबीकडे अर्ज, चौकशीदरम्यान दीपिकासोबत हजर राहण्याची मागितली परवानगी

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीच्या रडारवर बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी आहेत.सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर आणि दीपिका पदूकोण यांना देखील समन्स पाठवले गेले आहेत. या सगळ्यांची २५ आणि २६ सप्टेंबरला चौकशी केली जाईल. एनसीबीच्या सुत्रांनुसार, ड्रग्स पेडलर करमजीतने दावा केला आहे की त्याने श्रद्धा कपूरच्या नावावर चारवेळा वेगवेगळ्या जागांवर ड्रग्स पोहोचवले होते. चारही वेळा कारमध्ये ड्रग्स पोहोचवले गेले होते. मात्र ही गोष्ट अजुन स्पष्ट होऊ शकलेली नाही की ड्रग पॅकेट श्रद्धाने घेतले कि इतर कोणी..

दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पदूकोण गुरुवारी रात्री गोव्याहून मुंबईला पोहोचली. तिच्यासोबत पती अभिनेता रणवीर सिंह देखील होता. दीपिका पदुकोणचा पती रणवीर सिंहने एनसीबीकडे अर्ज केला आहे की त्याला चौकशी दरम्यान दीपिकासोबत राहायचं आहे. या अर्जामध्ये लिहिल्याप्रमाणे रणवीरने सांगितलं आहे की दीपिकाला कधी कधी भिती वाटते. त्यामुळे तिच्यासोबत राहण्याची त्याला परवानगी देण्यात यावी.

रणवीरने यात म्हटलंय की त्याला कायद्याचे नियम माहित आहेत की चौकशी दरम्यान तिथे कोणीही हजर राहु शकत नाही मात्र तरीही एनसीबीच्या कार्यालयाच्या आतापर्यंत येण्याची परवानगी हवी आहे. आता रणवीरचा हा अर्ज मान्य केला जातोय की फेटाळला जातोय हे येत्या काही वेळात समोर येईलंच.  दरम्यान दीपिका पदूकोण २६ सप्टेंबर म्हणजेच उद्या शनिवार रोजी चौकशीसाठी उपस्थित राहणार आहे. 

दीपिका पाठोपाठ सारा अली खान देखील गोव्याहून  आई अमृता सिंहसोबत मुंबईत पोहोचली. अभिनेत्री रकुलप्रीत सिंह आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची एनसीबी आज चौकशी करेल. या चौकशीतून आता कोणते नवे मुद्दे समोर येणार हेच पाहायचंय.   

deepika padukone bollywood drug case ranveer ranveer singh will join probe on 26th september  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Maharashtra politics: मूळ मुख्यमंत्री अमित शहा! देवेंद्र फडणवीस शॅडो CM, शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सवाल

Shraddha Bhosale : कुटुंब मूळचे गुजरातचे, जन्म मुंबईत, शिक्षण अमेरिकेत अन् सासर कोकणात; कोण आहेत श्रद्धा सावंत भोसले? भाजपनं दिलीय उमेदवारी

‘कसाब बिर्याणी मागतोय’ हा ‘माझाच फंडा’! खासदार ॲड. उज्ज्वल निकम; प्रकट मुलाखतीत उलगडले अनेक किस्से..

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

SCROLL FOR NEXT