Deepika Padukone Diagnosed With Heart Arrhythmia what is it sakal
मनोरंजन

Deepika Padukone Birthday: सुपर हॉट दीपिका 'हार्ट अरिथमिया'ने आहे त्रस्त.. काय आहे हा आजार?

अभिनेत्री दीपिका पदूकोण हिचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..

नीलेश अडसूळ

Deepika Padukone Birthday: बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पदुकोण गेली 15 वर्षे ती बॉलीवुडमध्ये कार्यरत आहे. तिनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत दीपिका अग्रेसर आहे. देशातील सर्वोत्तम सेलिब्रेटींमध्ये दीपिकाचे नाव घेतले जाते. अशा दीपिकाचा आज वाढदिवस. ती आज 37 वर्षांची झाली. दीपिका बॉलीवुडमध्ये खूप कमी वेळात यश मिळाले असले तरी त्यासाठी तिने दिवस रात्र मेहनत घेतली आहे. या मेहनतीमुळे बऱ्याचदा तिची प्रकृती खालवलेली दिसते. असाच एक आजार तिला अती काम आणि ताणामुळे जडला आहे.. त्याच विषयी थोडक्यात जाणून घेऊया..

(Deepika Padukone Diagnosed With Heart Arrhythmia what is it)

दीपिकाला आजवर अनेकदा हृदयशी संबधित आयोग्याच्या तक्रारी जाणवल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच तिला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. छातीत दुखत असल्याची ही तक्रार होती. तर त्याआधीही अभिनेता प्रभाससोबत हैद्राबादमध्ये एका चित्रपटाचं शुटींग करताना दीपिकाचा हार्ट रेट अचानक वाढला होता, तेव्हापण तिला रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. दीपिकाला सातत्याने होणारा हा त्रास पाहून त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिला 'हार्ट अरिथमिया' असल्याचं समोर आलं.

हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

हार्ट अरिथमिया म्हणजे या अवस्थेत हृदयाचा ठोका अनियमित होतो. अरिथमियाचे दोन प्रकार आहेत. टॅकिकार्डिया आणि ब्रॅडकार्डिया. यापैकी टॅकिकार्डियामध्ये हार्ट बीट्स वाढतात तर ब्रॅडकार्डियामध्ये हार्टबीट्स कमी होतात. यावेळी रुग्णाला छाती दुखणे, छातीत वेदना होणे, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा येणे, चक्कर येणे अशा स्वरूपाचा त्रास होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT