Karan Johar Personally Invites Deepika Padukone For Koffee With Karan 7 But She Refuses Offer Google
मनोरंजन

KWK 7: रातोरात दीपिकाचं शो च्या गेस्ट लिस्टमधनं नाव कट, मोठं कारण समोर

करण जोहरचा प्रसिद्ध चॅट शो कॉफी विथ करणचा सातवा सिझन मोठ्या दिमाखात सुरु झाला आहे.

प्रणाली मोरे

करण जोहरचा(Karan Johar) प्रसिद्ध चॅट शो कॉफी विथ करणचा (Koffe With karan7) सातवा सिझन मोठ्या दिमाखात सुरु झाला आहे. पहिल्याच एपिसोडपासून सेलिब्रिटींचे अनेक सीक्रेट्स शो मधून समोर येताना दिसत आहेत. अनेक बडे-बडे स्टार्स करणच्या समोर बसले की जे त्यांच्या मनात आहे ते थेट बोलून मोकळे होतात,अन् मग काय चर्चा जोरदार रंगते त्या सगळ्या मसाल्याची. पण आता बातमी समोर येत आहे की करणच्या या चॅट शो मधील गेस्ट लिस्टमध्ये दीपिका पदूकोणचे(Deepika Padukone) नावच नाही. दीपिकाने खरंतर याआधी कॉफी विथ करणच्या सर्वच सिझनमध्ये हजेरी लावली होती.(Deepika Padukone For Koffee With Karan 7 But She Refuses Offer)

शो संबंधित काही माहिती महत्वाच्या सूत्रांकडून मिळाली आहे ती अशी की दीपिकाला करण जोहरने वैयक्तिक फोन करुन शो मध्ये येण्यासाठी निमंत्रण दिले होते. करणने अभिनेत्रीचं शो मध्ये येण्यासाठी मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला,तिची खुशामत देखील विविध पद्धतीनं केली पण दीपिका काही तयार झाली नाही. यंदाच्या सीझनपासून स्वतःला लांब ठेवण्याचा निर्णय तिनं घेतला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार,दीपिकानं शो साठी हो म्हटलेलं नाही. पण तिनं न येण्याचं कारणही स्पष्ट केलेलं नाही. आता बातमी कानावर पडतेय की रणवीरच्या न्यूड फोटोशूटनंतर दीपिकानं हा निर्णय घेत स्वतःचे नाव गेस्ट लिस्टमधून काढल्याचं देखील बोललं जात आहे. दीपिका शो मध्ये हजर राहणार होती, लवकरच त्या एपिसोडचं शूटही होणार होतं. पण दरम्यान रणवीर सिंग न्यूड फोटोशूट वाद निर्माण झाला आणि अभिनेत्रीनं करणच्या कॉफी विथ करण ७ पासून लांब राहण्याचा निर्णय घेतला असावा, असे अंदाजही बांधले जात आहेत.

कॉफी विथ करणच्या पहिल्या भागात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट आले होते. त्यावेळी दोघांनीही आपले बेडरुम सीक्रेट्स करणसमोर बोलून दाखवले अन् त्याची भलतीच चर्चा रंगली. यावेळी रणवीरनं दीपिकाचा नंबर आपल्या फोनमध्ये आपण काय नावानं सेव्ह केलाय. त्याचं आणि त्याच्या सासूमधील नातं कसं फुलत गेलं याविषयी देखील त्याने सांगितले होते. आता दीपिकाची आई देखील आपल्याला आपल्या आईसारखीच कशी वाटते हे सांगताना देखील अभिनेता भावूक झालेला दिसला होता.

दीपिका पदूकोण आणि सोनम कपूर २०१० मध्ये एकत्र करणच्या कॉफी विथ करण शो मध्ये उपस्थित राहिल्या होत्या. तेव्हा दोघींनीही रणबीर कपूर आणि बीटाऊनच्या अभिनेत्यांविषयी अनेक खुलासे केले होते. तो एपिसोड आपला सगळ्यात फेव्हरेट एपिसोड होता असं करण म्हणाला होता. त्यामुळे दीपिका यंदाच्या शो मध्ये येणार नाही यामुळे करण नक्कीच खट्टू झाला असणार.

पण दीपिका मात्र आता कुठल्याच वादात पडायच्या मनःस्थितीत दिसत नाहीय. एरव्ही बिनधास्त वक्तव्य करणारी दीपिका आता मात्र खूपच विचार करुन निर्णय घेताना दिसत आहे. तरी देव करो, अन् करणला दीपिकाचं मन वळवण्यात यश मिळो हीच सर्व चाहत्यांची मात्र इच्छा असणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT