Deepika padukone Goodnews! Google
मनोरंजन

Good News: भारतासाठी दीपिकाची 'ही' कामगिरी ठरतेय लक्षवेधी

आंतरराष्ट्रीय पातळीवर दीपिकानं भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्यानं तिचे चाहते मात्र सुखावले आहेत.

प्रणाली मोरे

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदूकोणनं(Deepika Padukone) गूडन्यूज दिली म्हटल्यावर चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळत आहे. आता ती गूडन्यूज नेमकी कोणती आहे यावरनं वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. कारण आता दीपिका गूडन्यूज देणार म्हणजे पहिल्यांदा सर्वांनाच वाटलं असेल अनुष्का,प्रियंकानंतर आता दीपिकानंही आई होण्याचा निर्णय घेतला असणार. पण सर्वात पहिलं आम्ही हे स्पष्ट करतो की दीपिका पदूकोण हिच्या गूडन्यूजचा आणि आई होण्याचा सध्यातरी काही संबंध नाही. दीपिकानं ही गूडन्यूज एका वेगळ्याच बाबतीत दिली आहे पण त्यामुळं भारताची मान मात्र उंचावली आहे. काय आहे ती गूडन्यूज?

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदूकोण २०२२ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमांचं परिक्षण करताना परिक्षक म्हणून दिसणार आहे. या वर्षी भारतीय फिल्म इंडस्ट्रीतून कान्समध्ये सामिल होणारी दीपिका पदूकोण ही एकमेव अभिनेत्री आहे. ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये फ्रान्सचा अभिनेता विनसेंट लिनडन परिक्षकांचं प्रतिनिधित्व करणार आहे. हे फेस्टिव्हल १७ मे ते २८ मे २०२२ दरम्यान रंगणार आहे.

दीपिका पदूकोण मिळून एकूण ८ परिक्षकांची ही टीम असणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये सामिल झालेल्या एकूण २१ सिनेमांपैकी एका सिनेमाची निवड करण्याची धुरा या परिक्षकांवर असणार आहे. फेस्टिव्हलच्या क्लोजिंग सेरेमनीच्या दिवशी या निवडलेल्या सिनेमाला पाम अॅवॉर्ड देण्यात येणार आहे. दीपिकासोबतच परिक्षक म्हणून रेबेका हाल,स्वीडीश अॅक्टर नूमी रैपेस,इटालियान अॅक्टर जैसमिन ट्रिंका,ईराणी फिल्ममेकर असगर फरहादी, फ्रेंच फिल्ममेकर लैज ली, जेफ निकोलस आणि दिग्दर्शत वाकहिम ट्रियर यांचा समावेश असणार आहे.

सोशल मीडियावर दीपिका पदूकोणच्या कान्स फिल्म फेस्टिवल २०२२ मध्ये परिक्षक म्हणून सामिल होण्याची बातमी ट्रेंडिगला आहे. दीपिकाचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. तिच्या काही चाहत्यांचे ट्वीट्स आम्ही या बातमीत जोडत आहोत. दीपिका पदूकोण याआधी MAMI म्हणजे मुंबई फिल्म फेस्टिव्हल मध्ये परिक्षकांचं प्रतिनिधित्व करताना दिसली होती. दीपिकाच्या आधी भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधून मृणाल सेन,मीरा नायर,अरुंधती रॉय,ऐश्वर्या राय-बच्चन,नंदिता दास,शर्मिला टागोर,शेखर कपूर,विद्या बालन असे सेलिब्रिटी कान्स फिल्म फेस्टिव्हल परिक्षक म्हणून सामिल झाले होते.

दीपिकाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर,गहराइयां सिनेमातून ती बोल्ड अंदाजात दिसली होती. यात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी,अनन्या पांडे देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. आता ती लवकरच शाहरुखसोबत पठाणं सिनेमात दिसणार आहे. हृतिक रोशनसोबत फायटर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत द इंटर्न सिनेमात दीपिका काम करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT