Deepika Padukone Kept Her 'Promise' On Yeh Jawaani Hai Deewani Set, Says mehendi Artist Veena Nagda  SAKAL
मनोरंजन

Deepika Padukon: दिलेला शब्द दीपिकाने पाळला! लग्नाला या खास व्यक्तीला दिलेलं आमंत्रण, कोण आहे ती?

दीपिका पादुकोणने एका व्यक्तीला दिलेला शब्द पाळुन तिला खास आमंत्रण दिलं

Devendra Jadhav

Deepika Padukon News: दीपिका पादुकोण ही भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. दीपिकाने आजवर हिंदीच नव्हे तर हॉलिवुडच्या सिनेमांमध्ये काम करुन सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलं.

या वर्षाच्या म्हणजेच २०२३ च्या सुरुवातीलाच दीपिकाने पठाण सिनेमातुन भन्नाट अभिनय केला. तर अलीकडेच रिलीज झालेल्या जवान सिनेमात सुद्धा दीपिका शाहरुख खान सोबत झळकली.

दीपिकाबद्दल एक खास गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जेव्हा दीपिकाने एका व्यक्तीला दिलेला शब्द पाळुन तिला स्वतःच्या लग्नात विशेष आमंत्रण दिलं होतं. कोण होती ती व्यक्ती आम्ही तुम्हाला सांगतो.

दीपिका पादुकोणचा ये जवानी है दिवानी सिनेमा सर्वांना आठवत असेलच. दीपिकाने या सिनेमात नैनाची भुमिका साकारली होती.

किस्सा असा की, ये जवानी है दिवानी सिनेमात दीपिकाच्या हातावर मेहंदी रंगली होती. मेहंदी आर्टिस्ट, वीणा नगाडा यांनी दीपिकाच्या हातावर ही मेहंदी रंगवलेली. दीपिकाला ही मेहंदी इतकी आवडली की तिने त्यांना, मी तुम्हाला माझ्या लग्नाला नक्की बोलवेल असा शब्द दिला.

२०१८ वर्ष. दीपिकाने रणवीर सिंग सोबत थाटामाटात लग्न केलं. आणि या लग्नाच्या वेळी दीपिकाने वीणा यांना दिलेला शब्द पाळला. दीपिकाच्या लग्नात तिच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी वीणा यांना आमंत्रण देण्यात आले.

वीणा यांना आनंद झाला. कारण ये जवानी है दिवानीच्या सेटवर दीपिकाने वीणा यांना दिलेला शब्द पाळला. वीणा यांनी दीपिकाच्या लग्नातही तिच्या हातावर सुंदर मेहंदी काढली.

या खास घटनेबद्दलल वीणा यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करुन लिहीलंय की, "ये जवानी है दिवानीच्या शूटिंग दरम्यान तिने मला एक वचन दिले होते की मी तिच्या लग्नात मेहंदी लावेन आणि ती तिच्या शब्दांवर ठाम राहिली म्हणजे माझ्यासाठी जग आहे. मी माझ्या आयुष्यात भेटलेल्या सर्वात छान व्यक्तींपैकी एक!" अशी पोस्ट लिहून त्यांनी दीपिकासोबतचे फोटो शेअर केलेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारला मोठा धक्का, सोनम वांगचूक यांना तातडीने खासगी रुग्णलयात दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश, नेमकं काय सांगितलं?

Fifa World Cup 2026: मेस्सीच्या अर्जेंटिनाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी फिफाने मदत केली! आरोपांना ख्रिस्तियानो रोनाल्डोचे समर्थन?

SIR चा फॉर्म मोबाईलवरून ऑनलाइन कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या; 29 जुलै शेवटची तारीख

SIP Investment: महिन्याला फक्त 500 रुपयांची SIP तुम्हाला श्रीमंत बनवू शकते का? 10 आणि 20 वर्षांनंतर किती पैसे मिळतील ते पाहा

Live Updates Marathi : लोकआयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT