Deepika Padukone in Gehraiyaan 
मनोरंजन

दीपिकाने सांगितला 'गेहराईयाँ'मधील इंटिमेट सीन शूट करतानाचा अनुभव..

"माझी भूमिका ही 'बोल्ड' नाही तर 'रिअल' आहे."

स्वाती वेमूल

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) आगामी 'गेहराईयाँ' (Gehraiyaan) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील भूमिका खऱ्या अर्थाने आव्हानात्मक असल्याचं तिने ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात सांगितलं. शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या ट्रेलरमध्ये दीपिकाचे काही इंटिमेट सीन्ससुद्धा पहायला मिळतात. असे सीन्स शूट करताना कोणत्या अडचणी समोर आल्या, याबाबत ती या मुलाखतीत व्यक्त झाली.(Deepika Padukone on Gehraiyaan intimate scenes)

इंटिमेट सीन शूट करताना सेटवरील वातावरण हलकंफुलकं आणि तितकंच सुरक्षित ठेवण्याची मुख्य जबाबदारी ही दिग्दर्शकावर असते, असं ती म्हणाली. "गेहराईयाँ या चित्रपटातील माझ्या भूमिकेसमोर बरीच आव्हानं होती. कारण पडद्यावर इंटिमेट होणं हे काही सोपं नसतं. जर शकुनने सगळं नीट हाताळलं नसतं तर कदाचित हे शक्य झालं नसतं. आपण याआधी भारतीय चित्रपटसृष्टीत अनुभवली नाहीत, अशी दृश्ये यामध्ये आहेत. माझी भूमिका ही 'बोल्ड' नाही तर 'रिअल' आहे. अशा पद्धतीची भूमिका मी याआधी कधीच साकारली नव्हती. अशी भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप खोलवर जावं लागतं. त्यासाठी मला स्वत:च्या आयुष्यातील काही कटू अनुभवांना पुन्हा आठवावं लागलं," अशा शब्दांत ती व्यक्त झाली. (Gehraiyaan Movie trailer)

'गेहराईयाँ' या चित्रपटात दीपिकाने अलिशाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारी रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. दीपिका, सिद्धांत, अनन्या यांच्यासोबतच धैर्य कारवा, नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT