Deepika Padukone Ranveer Singh New House Near  esakal
मनोरंजन

Deepika-Ranveer Singh : शाहरुखचा शेजारी व्हायचं म्हणून दीपिका-रणवीरनं मोजली मोठी किंमत!

काही करुन आपल्याला शाहरुखचे शेजारी व्हायचं ही त्यांची इच्छा होती. अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Deepika Padukone Ranveer Singh New House : बॉलीवूडची प्रसिद्ध जोडी दीपिका आणि रणवीर सिंग हे नेहमीच त्यांच्या हटक्या शैलीमुळे चर्चेत असतात. आता ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. या दोघांनी मिळून एक मुंबईमध्ये अलिशान घराची खरेदी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नव्या घराची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. Deepika Padukone Ranveer Singh

मीडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही सेलिब्रेटी याच वर्षी त्यांच्या नव्या घरात स्थायिक होणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे हे नवे घर बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मन्नत जवळ आहे. त्यामुळे ती गोष्ट त्यांच्यासाठी खास आहे. काही करुन आपल्याला शाहरुखचे शेजारी व्हायचं ही त्यांची इच्छा होती. अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्याचे दिसून आले आहे. चाहत्यांनी या दोन्ही सेलिब्रेटींचे कौतूक केले आहे.

या वर्षाच्या अखेरीस रणवीर आणि दीपिका नव्या घरात शिफ्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे दोघे जण शाहरुखचे शेजारी होणार असल्याचे कळताच शाहरुखच्या चाहत्यांनी एसआरकेच्या सोशल मीडिया पेजवर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. त्या कमेंट्स देखील भलत्याच भन्नाट आहे. त्यातच दीपिका आणि रणवीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तो नव्या घराचे बांधकाम पाहण्यासाठी बांद्रा येथे गेल्याचे दिसत आहे.

त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, आता तुम्ही शाहरुखचे शेजारी झालात. तुमचे अभिनंदन. दुसऱ्यानं म्हटले आहे की, तुम्ही काहीही करा, पण एसआरके इतके फॅन्स काही तुम्हाला मिळणार नाहीत की ते तुमच्या घराबाहेर जमणारही नाहीत. तिसऱ्यानं लिहिलं आहे की, शेवटी शाहरुखपासून दीपिकाला जास्त वेळ लांब राहता आले नाही हेच खरं. अशी शेलक्या कमेंट्स देखील त्या व्हिडिओवर आल्या आहेत.

दीपिका-रणवीरच्या फ्लॅटची किंमत आहे तरी किती...

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही सेलिब्रेटींनी मिळून चार मजली घर घेतले आहे. त्याची किंमत ११९ कोटी रुपये एवढी आहे. सोळा ते १९ मजल्यापर्यत रणवीर आणि दीपिकानं घर खरेदी केले आहे. असं म्हटल जातंय की, सोळाव्या मजल्यावर दीपिकानं चार बीएचके घराचे बांधकाम केले आहे. तर १७ ते १९ मजल्यापर्यत पेंट हाऊसचे काम सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT