Deepika Padukone said Cannes Would Be At India film festival
Deepika Padukone said Cannes Would Be At India film festival  esakal
मनोरंजन

कान्समध्ये जावून कान्सच्याच... दीपिका बिनधास्त बोलली

युगंधर ताजणे

Cannes 2022: जगभरातील सिनेप्रेक्षकांना ज्या चित्रपट सोहळ्याचे वेध लागले असतात त्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. यंदा कान्समध्ये (Cannes Festival 2022) चित्रपटांपेक्षा भारताचा त्यातील सहभाग याचीच जास्त चर्चा रंगताना दिसत आहे. भारतातून मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांचा (bollywood movie) मोठा ताफा कान्समध्ये गेला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांच्यासह तापसी पन्नु, नवाझुद्दीन सिद्धिकी, दीपिका पदुकोण, नयनतारा, आर माधवन यांच्या नावाचा समावेश आहे. या सेलिब्रेटींच्या चित्रपटांचे स्क्रिनिंग (deepika padukone) कान्समध्ये होणार आहे. दीपिका यंदाच्या कान्समध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. तिनं यावेळी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. दीपिका काय म्हटली हे आपण जाणून घेणार आहोत.

गेल्या महिन्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी तेथील सांस्कृतिक मंत्र्यांशी केलेली चर्चा फळाला आल्याचे दिसून आले आहे. कान्समध्ये भारताला मिळालेलं स्थान यामध्ये मोदी यांचा वाटा महत्वाचा असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. कान्ससारख्या जागतिक चित्रपट महोत्सवामध्ये भारताला मिळालेला गौरवाचं स्थान समस्त भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. यासगळ्या मुद्दयांकडे दीपिकानं लक्ष वेधले आहे. तिनं आपल्या भाषणातून उपस्थित प्रेक्षकांना, अभ्य़ासकांना चकीत केलं आहे. यापुढील काळात भारत हा कान्समध्ये नसेल तर भारतात कान्स होईल. अशी टिप्पणी दीपिकानं केली आहे.

दीपिका म्हणाली, भारताचा कान्समध्ये होणारा गौरव हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. कान्सला देखील 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याला 75 वर्षे पूर्ण झाली असल्यानं यानिमित्तानं जो गौरव भारताच्या वाट्याला आला आहे त्याचे समाधान मोठे आहे. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर आहे. आता ती आपल्यासमोर येते आहे. त्याला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. जागतिक पातळीवरुन त्या कलेला मिळणारा प्रतिसाद यामुळे कलाकाराचं होणारं कौतुक यामुळे चित्रपट माध्यमाची व्याप्ती आणखी वाढण्यास मदत होते. असे दीपिकानं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT