deepika ranveer 
मनोरंजन

दीपिका पदूकोणच्या मोबाईलमध्ये 'या' नावाने सेव्ह आहे रणवीरचा नंबर

सकाळवृत्तसेवा

मुंबई-  लॉकडाऊनमध्ये सेलिब्रिटीही आपापल्या घरी कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. कधी कधी चाहत्यांसोबत वेळ घालवण्यासाठी ते सोशल मिडीयावर देखील ऍक्टीव्ह होत असतात. इतकंच नाही तर या लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. सोशल मिडियावर त्यांच्या चाहत्यांद्वारे व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ त्यांना जुन्या दिवसांची आठवण करुन देत आहेत. नुकताच दीपिकाने सोशल मिडियावर त्यांच्या फॅमिली चाटचा एक स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. हा स्क्रीनशॉट पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. 

अभिनेत्री दीपिका पदूकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शुक्रवारी तिच्या फोनवरुन फॅमिलीसोबत चर्चा केली. त्यावेळी तिने या फॅमिली चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटवरुन हे समोर आलं आहे की दीपिकाने पती रणवीर सिंगचं नाव काय नावाने सेव्ह केलं आहे. इतकंच नाही तर तिचे आई-वडिल आणि सास-यांचंं नाव काय सेव्ह केलं याविषयीची माहितीही समोर आली आहे.

दीपिकाने तिच्या आईचं नाव अम्मा, वडिलांचं पप्पा, सासरे म्हणजेच रणवीरच्या वडिलांचं नाव जगजीत सिंह भवनानी आणि पती रणवीर सिंहचं नाव हँडसम नावावे सेव्ह केलंय. 

दीपिकाने ही पोस्ट शेअर करताना लिहिलंय, 'आणि अशा प्रकारे आम्ही एकमेकांशी जोडले जातो. जेव्हा कधी कुटुंबातील कोणा व्यक्तीसाठी महत्वाचा दिवस असतो तेव्हा आम्ह अशा त-हेने एकमेकांसोबत जोडले जातो. प्रत्येकाने माझा पती रणवीरने घेतलेल्या मुलाखतीचं अशा प्रकारे कौतुक केलं आहे. जर काही व्यवस्थित नसेल तरीही आम्ही एकमेकांना तसा सल्ला देतो. आम्ही सांगतो की कुठे काय चुकलं आणि ते कसं करायला हवं होतं. आणि हे आमच्यासाठी खूप महत्वाचं देखील असतं.'

दीपिकाने शेअर केलेला हा स्क्रीनशॉट चाहत्यांना पसंत पडतोय. इतकंच नाही तर रणवीर-दीपिकाच्या चाहत्यांना तर दीपिकाने रणवीरचं सेव्ह केलेलं नाव चांगलंच आवडतंय. अनेकजण या जोडीचे खूप मोठे चाहते आहेत.   

deepika padukone shared a screenshot of their family whatsapp chat revealed ranveer name  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT