deepika 
मनोरंजन

दीपिकाने सोशल मिडियावरुन पोस्ट डिलीट केल्यानंतर आता चाहत्यांसाठी शेअर केली 'ऑडिओ डायरी'

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदूकोणने ३१ डिसेंबरला तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. दीपिकाने तिच्या सर्व सोशल मिडियावरुन सगळ्या पोस्ट डिलीट केल्या. दीपिका सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. ती तिच्या खाजगी आयुष्यातील आणि करिअरमधील महत्वाच्या गोष्टी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र ३१ डिसेंबरच्या रात्री दीपिकाने जेव्हा तिच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरुन सगळ्या पोस्ट डिलीट केल्या तेव्हा सगळेच विचारात पडले. कोणालाच अंदाज लावता येत नव्हता की नेमकं काय झालंय? आणि दीपिकाने असं का केलंय ते.

दीपिकाने अखेर १ जानेवारी २०२१ला वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक ऑडिओ क्लीप शेअर करत पुन्हा सोशल मिडियावर परतली. दीपिकाच्या या ऑडिओ क्लीपचं नाव 'माय ऑडिओ डायरी' असं आहे. ही क्लिप या ऑडिओ डायरीचा पहिला भाग आहे. यामध्ये दीपिकाने तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपिकाने या ऑडिओ क्लीपमध्ये म्हटलंय, ''सगळ्यांना हाय, माझ्या ऑ़डिओ डायरीमध्ये तुम्हा सगळ्यांच स्वागत आहे. ही माझ्या मतांची आणि भावनांची रेकॉर्डिंग आहे. तुम्ही सगळे माझ्या या गोष्टीशी सहमत असाल की २०२० प्रत्येकासाठी अनिश्चततेने भरलेला होता. मात्र माझ्यासाठी हे वर्ष कृतज्ञतेने परिपूर्ण होतं. २०२१ साठी मी स्वतःसाठी आणि तुम्हा सगळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि मन: शांतीसाठी प्रार्थना करते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.''

जेव्हा दीपिकाच्या सगळ्या पोस्ट डिलीट झाल्या तेव्हा लोकांना वाटलं की कदाचित तिचं अकाऊंट हॅक झालं आहे. मात्र जेव्हा दीपिकाने ऑडिओ डायरी पोस्ट केली तेव्हा सगळ्यांनी अंदाज लावला दीपिकाची ही नवीन ट्रीक आहे ज्यामध्ये ती आता ऑडिओ शेअर करत राहील. सोशल मिडियावर दीपिकाची मोठी फॅन फॉलोईंग आहे तेव्हा तिची ही ट्रीक पाहिलयानंतर आता तिचे फॉलोअर्स कमी होतात की वाढतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. 

deepika padukone shares her audio clip on first day of new year after deleting all her social media posts

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT