Deepika Padukone Sister anisha padukone is a profesional Golf Player,who is not less than any bollywood celebrity Google
मनोरंजन

Deepika Padukone ची बहीण चर्चेत, अनिशा पदूकोण आहे 'देशाचा गौरव'

अनिशा पदूकोण ही दीपिकाची लहान सख्खी बहीण असून सध्या तिचं नाव खेळाच्या दुनियेत आघाडीवर आहे.

प्रणाली मोरे

Deepika Padukone's Sister Anisha Padukone: दीपिका पदूकोणची गणना बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींमध्ये केली जाते,ज्यांना चर्चेत रहायला फार काही वेगळं करावं लागत नाही. सोशल मीडियावर तिची एक झलक दाखवणारे व्हिडीओ नेहमीच डिमांडवर असतात. सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट,फोटो आणि सिनेमांव्यतिरिक्त तिचं वैयक्तिक आयुष्य हे सारं नेहमीच चर्चेत असलेलं पहायला मिळतं. पण सध्या दीपिकाची बहिण अनिशा पदूकोणची जोरदार चर्चा आहे, जिचा ग्लॅमर इंडस्ट्रीशी दूर दूरपर्यंत संबंध नाही पण मनात आणेल तर बड्या अभिनेत्रींना पिछाडीवर टाकेल.(Deepika Padukone Sister anisha padukone is a profesional Golf Player,who is not less than any bollywood celebrity)

दीपिका पदूकोण आणि अनिशा पदूकोण यांच्यात 5 वर्षाचं अंतर आहे. दोघींचं बालपण बंगळुरात गेलं. अनिशानं माउंट कार्मेल कॉलेजातनं शिक्षण घेतलं आहे. अनिशाने आपले वडील प्रकाश पदूकोण यांच्याप्रमाणेच स्पोर्ट्स मध्ये करिअर बनवलं आहे. दीपिका आणि अनिशाचे वडील प्रकाश पदूकोण हे प्रसिद्ध बॅडमिंटन पट्टू होते. दीपिकानं अनेक मुलाखतीतून आपले वडील आपल्यासाठी हिरोसमानच आहेत असं जाहिररित्या सांगितलं आहे,तर दुसरीकडे अनिशासाठी तिचे वडील खेळातील आदर्श आहेत. अनिशानं आपल्या बहिणीसारखं अभिनय क्षेत्र न निवडता गोल्फर बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि आज ती यशस्वी गोल्फर आहे.

अनिशा स्वतःला लाइमलाइटपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसते. ती नेहमीच खूप निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर करते. जिथे दीपिका ग्लॅमर इंडस्ट्रीत टॉपवर दिसते तिथे अनिशा अगदी साधं, सोज्वळ आयुष्य जगताना दिसते.

अनिशाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप निवडक फोटो आहेत,ज्यात दीपिकासोबतच्या फोटोंमध्ये ती तिची कार्बन कॉपीच दिसते. दीपिकाची बहिण अनिशा खूप उत्तम गोल्फ खेळते. तिनं कितीतरी वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे आणि देशाचं नावही मोठं केलं आहे. बोललं जातं की अनिशा तेव्हा फक्त १२ वर्षांची होती जेव्हा तिनं गोल्फ खेळायला सुरवात केली. इतकंच नाही तर तिला खेळांविषयी इतकं गाढ प्रेम आहे की ती केवळ गोल्फ नाही, तर क्रिकेट,टेनिस,बॅडमिंटन आणि हॉकी सारख्या खेळातही निपुण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT