deepika prabhas 
मनोरंजन

 प्रभाससोबत काम करुन दीपिका बनणार सगळ्यात महागडी अभिनेत्री? घेतेय इतके कोटी रुपये..

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- दीपिका पदूकोण आज बॉलीवूडमधील सगळ्यात टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जेव्हा कधी तिच्या सिनेमाची घोषणा होते तेव्हा सोशल मिडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु होतात. नुकतीच दीपिकाने ती बाहुबली फेम अभिनेता प्रभाससोबत आगामी सिनेमात काम करणार असल्याची घोषणा केली. पण तुम्हाला हे माहित आहे का की या सिनेमासाठी ती केवढी मोठी रक्कम घेत आहे? 

दीपिका पदूकोण आणि प्रभास ही स्वप्नातली जोडी आता सत्यात उतरणार आहे. ही जोडी पडद्यावर पाहण्यासाठी अनेकजण वाट पाहत होते.या दोघांचा हा आगामी सिनेमा वैजयंती मुव्हीजद्वारे निर्मित केला जाणार आहे आणि याचं दिग्दर्शन अश्विन नाग करणार आहेत. ही माहिती जशी समोर आली त्यानंतर थोड्याच वेळात इंटरनेटवर ही बातमी ट्रेंड व्हायला लागली. आता तर सिनेमाविषयीची आणखी एक नवीन अपडेट समोर येत आहे. 

त्याचं झालं असं की साऊथच्या निर्मात्यांनी दीपिकाला या सिनेमासाठी कसं मनवलं याचा खुलासा झालाय. एका रिपोर्टनुसार या सिनेमासाठी दीपिका पदूकोणला २० कोटी रुपये दिले जाणार आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार दीपिका सुरुवातीला या प्रोजक्टसाठी तयार नव्हती. तिने हा सिनेमा करणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र सिनेमाच्या निर्मात्यांना दीपिकाच या सिनेमासाठी योग्य वाटत होती. 

सुत्रांच्या माहितीनुसार, सध्या दीपिका सिनेमातील हिरोला किती मानधन दिलं जातंय यावर तिचं मानधन ठरवते. तिला असं वाटतं की तिने आता इंडस्ट्रीमध्ये तिची चांगली जागा निर्माण केली आहे. तसं पाहायला गेलं तर या सिनेमात दीपिकाचं मानधन प्रभासच्या मानधनापेक्षा खूप कमी असलं तरी २० कोटी मानधन मिळाल्यावर ती भारतीय सिनेमातली सगळ्यात महागडी अभिनेत्री बनू शकते. या सिनेमासाठी प्रभासला ५० कोटी मानधन असल्याचं देखील कळतंय. 

लॉकडाऊननंतरच या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात होईल तोपर्यंत सिनेमाची टीम दीपिकाच्या भूमिकेवर मेहनत घेतेय. आधी ही भूमिका फारसी स्ट्राँग नव्हती मात्र दीपिकाने होकार दिल्याने आता तिची भूमिका महत्वपूर्ण करण्यावर भर दिला जातोय.    

deepika will become highest paid actress of indian cinema with upcoming prabhas starrer film  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT