Delhi Metro Girl Urfi Javed 2.0: Esakal
मनोरंजन

Delhi Metro Girl: दिल्लीत झपाट्याने वाढतोय 'उर्फी व्हायरस'! मेट्रोत एकीनं सादर केला विचित्र फॅशनचा नमुना

Vaishali Patil

उर्फी जावेद हे इतक चर्चेतल नावं झालयं की त्याबद्दल जास्त सांगण्याची गरजच नाही. ती नेहमीत तिच्या अतरंगी फॅशनमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच देते. तिची फॅशन पीहिल्यानंतर नेटकरी डोक्याला हातच लावतात.

नुकतच तिनं ती असे कपडे पुन्हा घालणार नाही आणि ती नव्या अंदाजात दिसेल असे सांगितले. त्यामुळे उर्फी सुधरली असल्याच नेटकऱ्यांना वाटलं, पण उर्फीनं सर्वांनाच एप्रिल फुल बनवलं. उर्फी सार्वजनिक ठिकाणी असे विचित्र कपडे परिधान करते यामुळे अनेकांचा तिला विरोध देखील असतो. त्यातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तर उर्फीविरुद्ध तक्रार केली. त्यादोघींमधला वाद बराच गाजला.

मात्र आता उर्फी ही काही लोकांसाठी फॅशन आयकॉन बनली आहे. अनेक लोक तिला सोशल मिडियावर फॉलो करतात. तिलाच नव्हे तर ते तिची फॅशनही फॉलो करतांना दिसत आहे. उर्फीचे खिल्ली उडवणारे अनेक व्हिडिओ आपण सोशल मिडियावर पाहतो मात्र सध्या उर्फीला कॉपी करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला.

दिल्ली मेट्रो गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर खूप ट्रेंड करत आहे. मेट्रोमध्ये एका मुलीचा व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बिकिनी परिधान करून मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. बघता बघता हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की तो चर्चेचा विषय बनला. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

हे व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने उर्फी जावेदच्या व्हायरसपासून सावध राहा, असं लिहिले आहे. बर्‍याच लोकांनी उर्फी आणि या मुलीचा कोलाज बनवत ट्रोल देखील केले आहे जे व्हायरल होत आहे. तर आणखी एका यूजरने लिहिले की, हा एक खतरनाक व्हायरस आहे जो दिल्लीकडे सरकत आहे.

Delhi Metro Girl Urfi Javed 2.0:

ही बिकिनी घातलेली ही मुलगी ट्विटरवर इतकी व्हायरल झाली की, ही मुलगी कोण आहे हे जाणून घ्यायचं होत. तर ही व्हायरल मुलगी ऋदम चनाना आहे. ती पंजाबची रहिवासी आहे. ऋदम ही एकमेव मुलगी आहे जी बिकिनी घालून दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसली होती.

जेव्हा ऋदमला याविषयी विचारण्यात आलं तेव्हा ऋदमने सांगितले की, ती प्रसिद्ध होण्यासाठी असे कपडे घालत नाही. तसेच तिला प्रसिद्धीची भूकही नाही. ती जे करायचं असतं ती तेच करते. गेल्या अनेक दिवसांपासून ती असाच प्रवास करत आहे.

त्याचवेळी ती उर्फी जावेदकडून प्रेरित झाली आहे का सवालही तिला विचारण्यात आला त्यावेळी तिने ती उर्फीला ओळखत नसल्याचं सांगितलं आहे. रिदम चन्नाने सांगितले की, तिच्या कुटुंबाला तिच्या पेहराव आणि विचार अजिबात आवडत नाहीत. त्यामुळेच तिचं स्वतःच्या कुटुंबासोबत जमत नाही. तिचे शेजारी तिच्या कुटुंबाला धमकावतात पण तिला त्याची पर्वा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT