Delhi Police Postpone jacqueline fernandez questioning schedule for 12th september
Delhi Police Postpone jacqueline fernandez questioning schedule for 12th september  Googel
मनोरंजन

मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिन विषयी दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय,वाचा सविस्तर

प्रणाली मोरे

jacqueline fernandez: मनी लॉन्ड्रिंग केस(Money Laundring Case) प्रकरणामुळे जॅकलिनच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेतत. पण या दरम्यान जॅकलिनची या केस संदर्भातील नवी अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांच्या EOW ने (आर्थिक गुन्हेगारी विभागानं) अभिनेत्रीच्या सोमवारी म्हणजे १२ सप्टेंबर,२०२२ रोजी होणाऱ्या चौकशीवर स्थगिती आणली आहे. यासंदर्भात EOW जॅकलिनला आता आणखी एक समन्स जारी करणार आहे. बोललं जात आहे की,दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला सुकेश चंद्रशेखर संबंधित २०० करोडच्या अफरातफरीच्या गुन्ह्या संदर्भात चौकशीचे आदेश दिले होते.(Delhi Police Postpone jacqueline fernandez questioning schedule for 12th september)

यासंदर्भात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी एका न्यूज एजन्सीला माहिती देताना सांगातिले की, जॅकलिनने दिल्ली पोलिसांना ईमेल द्वारे सूचित केले होते की दिल्ली पोलिसांचा आदेश जारी होण्यापूर्वीच तिने आधीपासून काही कमिटमेंट्स केल्या होत्या. त्या कारणानं तिला १२ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या आदेशाप्रमाणे चौकशीला हजर राहता येणार नाही. जॅकलिनला खरंतर १२ सप्टेंबर रोजी EOW च्या कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहायचे होते. पण आता ते तिला तिच्या काही कामांमुळे शक्य होत नसल्यानं तिला आणखी एक समन्स पोलिसांतर्फे जारी केलं जाईल. याची तारिख अद्याप निश्चित करण्यात आली नसली तरी लवकरच ती जाहीर केली जाईल.

संदर्भासाठी इथे थोडक्यात सांगतो की, ईडीनं आपल्या चार्जशीटमध्ये जॅकलिनचे मनी लॉन्ड्रि्ग केस प्रकरणात नाव सामिल केले होते. ईडीनं आपल्या चार्जशीटमध्ये म्हटले होते की जॅकलिनला सुकेशच्या गुन्ह्यां संदर्भात आधीपासून माहीत होतं. आणि तरीदेखील तिनं हे लपवून ठेवलं, इतकंच नाही तर त्याच्याकडून महागड्या वस्तू, रक्कम भेट म्हणून स्विकारली. मुंबई पोलिसांद्वारे दाखल केल्या गेल्या मनी लॉन्ड्रिंग केसच्या आधारे ईडीनं पुढील कार्यवाही करण्यास सुरुवात केली होती.

मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आल्यानंतर ती याआधीही ईडी समोर चौकशीसाठी हजर राहिली आहे. याप्रकरणात तिला ३० ऑगस्ट आणि २० ऑक्टोबर २०२१ रोजी चौकशीचे आदेश दिले होते. यादरम्यान अभिनेत्रीनं हे मान्य केलं होतं की सुकेशने तिला महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. बंगळुरूचा मूळ रहिवासी असलेला सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्ली जेलमध्ये कैदेत आहे आणि त्याच्या विरोधात १० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०० करोड रुपयांची मोठी अफरातफर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT