Munawar Faruqui instagram
मनोरंजन

Munawar Faruqui ला VHP ची धमकी; दिल्ली पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

Munawar Faruqui Delhi Show : बंगळुरूनंतर स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा दिल्लीतील शोही रद्द करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी येत्या 28 ऑगस्ट रोजी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला परवानगी देण्यास नकार दिला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या धमकीनंतर हा शो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुनव्वरचा शो आयोजित केल्याने शहरातील जातीय सलोखा बिघडू शकतो, अशी भीती पोलिसांना आहे. मुनव्वर फारुकीचा शो 28 ऑगस्ट रोजी मध्य दिल्लीतील केदारनाथ साहनी सभागृहात होणार होता. स्थानिक पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी देण्याची विनंती परवाना शाखेकडे पाठवली होती. मात्र, संबंधित परवाना शाखेने शोला परवानगी देण्यास नकार दिला आहे.

विहिंपने दिली होती धमकी

25 ऑगस्ट रोजी VHP दिल्लीचे अध्यक्ष सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून फारुकी यांनी आपल्या शोमध्ये हिंदू देवतांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर हैदराबाद येथील भाग्यनगर येथे वाद निर्माण झाल्याचा आरोप विहिंपने केला होता. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता आणि विश्व हिंदू परिषदेच्या विरोधानंतर दिल्ली पोलिसांनी फारुकी यांचा आगामी दिल्लीतील शो ला परवानगी देण्यास नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT