Delivary Boy Marathi Movie Teaser esakal
मनोरंजन

Delivery Boy Teaser : 'सरकारी अधिकाऱ्याला कुणी हात काय, टच पण करु नाय शकत'!

मराठी चित्रपट विश्वामध्ये गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटानं प्रेक्षकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

युगंधर ताजणे

Delivary Boy Marathi Movie Teaser : मराठी चित्रपट विश्वामध्ये गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटानं प्रेक्षकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास डिलिव्हरी बॉयचे नाव घ्यावे लागेल. प्रथमेश परबची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या टीझरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे एक धमाकेदार टीझरनं प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना 'सरोगसी'साठी तयार करताना दिसत असून यातून होणारा कल्लोळ आपल्याला चित्रपटात दिसणार आहे.

आता हे दोघे गावातील महिलांना सरोगसीसाठी का तयार करत आहेत, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेश आणि पृथ्वीक बरोबर अंकिता लांडेही पाटीलही प्रमुख भूमिकेत आहे. 'डिलिव्हरी बॉय'मधून प्रथमेश परब एका वेगळ्याच लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असून त्याचा हा नवा अंदाज चाहत्यांना नक्कीच आवडेल.

हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करणारा आहे, हे टीझरवरून कळतच आहे. आता हा नाद खुळा भाऊ आणि त्याचा जोडीदार गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करतो की आणखी अडचणी मागे लावून घेतो, हे बघताना प्रेक्षकांना धमाल येणार हे नक्की !

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. मनोरंजनाची हमी देणारा हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

याबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, " एका संवेदनशील विषयवार या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.चित्रपट विनोदी जरी असला तरी या नाजूक विषयांचे गांभीर्य आम्ही तितकेच जपले आहे. विनोदाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही नात्यांची गोष्ट आहे. जी प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पाहावी अशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सुनेने दाखल केलेल्या दाव्यातून वगळण्याचा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह इतरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

DK Shivakumar's Escort Car Overturns: मोठी बातमी! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कार महामार्गावर उलटली!

Latest Maharashtra News Updates : अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीची तात्काळ दखल; पंकजा मुंडे पोचल्या थेट पाहणीला

Narendra Modi: मोदींच्या सभेत महिलांचं 'खुर्ची युद्ध'! एकमेकींच्या डोक्यात घातल्या चेअर, Video Viral

इस्पितळात दाखल झालेली गरोदर बाई बाळाचा चेहरा पाहताच ओरडते... तुम्ही पाहिलाय का OTT वरील 'हा' थ्रिलर चित्रपट?

SCROLL FOR NEXT