Depp v. Heard docu-series coming on Netflix esakal
मनोरंजन

Depp vs Heard Docu-Series : नवरा बायकोच्या घरातल्या भांडणावर 'डॉक्युमेंट्री'!

अमेरिकेतल्या कोर्टामध्ये जॉनी डेपच्या विरोधात अंबरनं कौटूंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करण्यात आली होती.

युगंधर ताजणे

Depp vs Heard docu-series coming on Netflix : पायरेट्स ऑफ कॅरेबियन मधून प्रसिद्ध झालेला जॉनी डेपचं कौटूंबिक आयुष्य हा सगळ्यांसाठी चर्चेचा विषय झाला होता. जॉनीचं व्यसनी असणं, त्याच्या पत्नीचा रागीटपणा, दोघांमधील विसंवाद यामुळे त्यांचं नातं हे काही फार काळ टिकलं नाही. शेवटी त्यांचा घटस्फोट झालाच. पण तो ज्याप्रकारे झाला हे साऱ्या जगानं पाहिलं होतं. त्याची चर्चा झाली होती.

अमेरिकतेल्या कोर्टामध्ये जॉनी डेपच्या विरोधात अंबरकडून कौटूंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या खटल्यातील कित्येक धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या. डेपनं तर अंबर ही मानसिक रुग्ण असून तिच्या रागीट स्वभावाचा मला मोठा त्रास झाला. तिनं अनेकदा आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे म्हटले होते. अंबरनं देखील डेपची त्या खटल्यातून जेवढी बदनामी करता येईल तेवढी केली.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

डेप विरुद्ध हर्ड हा खटला सोशल मीडियावर देखील दाखवण्यात आला होता. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चाही झाली होती. अखेरीस कोर्टानं अंबरला डेपची मानहानी करणे, त्याच्यावर शाररिक अत्याचार करणे यामुळे मोठा दंड ठोठावला. हे सगळे प्रकरण, खटल्यातील महत्वाच्या गोष्टी हे सारं आता एका माहितीपटाच्या निमित्तानं समोर येणार आहे. नेटफ्लिक्सच्या वतीनं डॉक्युसीरिज प्रदर्शित होणार आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे.

नेटफ्लिक्सवर यापूर्वी देखील काही घटनांवर आधारित डॉक्युसीरिज प्रदर्शित झाल्या असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता जॉनी डेप आणि अंबरच्या माहितीपटाची उत्सुकता लागली आहे. त्या माहितीपटाचे नाव "Depp v. Heard" असे असणार आहे. अमेरिकन चित्रपटाच्या इतिहासात अनेक सेलिब्रेटींचे घटस्फोट झाले.त्याची कारणंही तऱ्हेवाईक होती. पण त्या प्रकरणाची चर्चा डेप आणि हर्ड इतकी झाली नाही.

न्यायाधीशांनी अंबरसोबत जॉनी डेपलाही (Johnny Depp) मानहानीच्या काही प्रकरणांमध्ये दोषी ठरवलं होतं. त्यालाही अंबरला २ मिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. सात सदस्यीय न्यायाधीशांना अंतिम निर्णय देण्यासाठी तीन दिवसांचा वेळ घेतला होता.

गेल्या वर्षी एप्रिल ते जूनच्या दरम्यान या प्रकरणाची सुनावणी अमेरिकेतील कोर्टात झाली होती. त्यावेळी त्या देशातील कित्येक माध्यमांचे लक्ष त्या खटल्याकडे होते. भारतामध्ये देखील जॉनीचे लाखो चाहते आहेत. आता नेटफ्लिक्सवरील माहितीपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. त्याचा प्रीमिअर १६ ऑगस्ट रोजी पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT