Dev Anand tried to pressurize Filmmakers to cast Wahida Rahman in Guide Movie SAKAL
मनोरंजन

Wahida Rehman: गाईड मध्ये वहिदा रहमान यांना घेण्यासाठी देव आनंद यांनी टाकलेला फिल्ममेकर्सवर दबाव

देव आनंद यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित होणं, हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल

Devendra Jadhav

आज ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमानचा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. वहिदा यांची मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला असेल.

आज विलक्षण योगायोग म्हणजे देव आनंद यांची आज १०० वी जयंती आहे. आणि याच दिवशी वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. देव आनंद यांची लाडकी हिरोईन म्हणजे वहिदा रहमान. इतकंच नव्हे तर वहिदाला सिनेमात घेण्यासाठी देव आनंद यांनी निर्मात्यांवर दबाव टाकलेला. काय होता तो किस्सा? वाचा

(Dev Anand tried to pressurize Filmmakers to cast Wahida Rahman in Guide Movie)

गाईड सिनेमासाठी देवानंदला वहिदाच हवी होती म्हणुन...

वहिदा रहमान श्रूती सोनल सोबत मुलाखतीत म्हणाल्या, "गाईड सिनेमा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये बनवण्यात आला आहे. विजय आनंद यांनी हिंदी आवृत्तीचे दिग्दर्शन केले, तर टेड डॅनिएल्स्की यांनी इंग्रजी आवृत्तीचे दिग्दर्शन केले. दोन्ही दिग्दर्शकांना माझ्यासोबत काम करायचे नव्हते. मात्र ही भूमिका केवळ वहिदाच करणार असल्याचे देव म्हणाले.

वहिदा रहमान मुलाखतीत पुढे म्हणाल्या, "मला सिनेमात घेण्यासाठी दिग्दर्शकांवर दबाव आणू नका, असे मी देवसाबला सांगितले. पण ते माझ्यासाठी ठाम राहिले सिनेमात मला घेण्याचा आग्रह त्यांनी धरला. माझ्यासाठी हा एक अतिशय रोमांचक क्षण होता, जेव्हा देवने मला सांगितले की जेव्हापासून त्यांनी आरके नारायणन यांचे पुस्तक वाचले तेव्हापासून त्यांनी गाईड मधल्या रोझीच्या भूमिकेत त्यांना मी दिसली."

वहिदा रहमान यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

दादासाहेब फाळके पुरस्कार हा बॉलिवूड चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. यावेळी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांची दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Disablity Day: दिव्यांगजनांना ३०० वरून १,००० रुपयांपर्यंत पेन्शन वाढ; योगींनी व्हीलचेअर वाटपासह केल्या अनेक योजना जाहीर

Latest Marathi News Live Update : शिंदे सरकारच्या राज्यपाल नियुक्त आमदारांविरोधातील याचिकेची आज सर्किट बेंचमध्ये सुनावणी

Police Action Airport : चोरट्यांचा पण नादखुळा! पळून जाण्यासाठी केला विमानाचा वापर, शेवटी चोर ते चोर पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

Nashik Municipal Election : नाशिक पालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; ६८.३४% नोंद, ४.६६ टक्क्यांची घट

Kolhapur Circuit Bench : २० वर्षांनंतर राष्ट्रगीत अवमान प्रकरणात मोठी कलाटणी; सर्किट बेंचचा हस्तक्षेप, ६ डिसेंबरचा निकाल स्थगित

SCROLL FOR NEXT