devendra Fadnavis first reaction after watching the kerala story slam ncp Jitendra awhad watch video  
मनोरंजन

Devendra Fadnavis : 'सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आलीय'; 'द केरळ स्टोरी' पाहिल्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

The Kerala Story Movie: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. काही राज्यामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात असून काही राज्यांनी मात्र हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे

रोहित कणसे

Devendra Fadnavis: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. काही राज्यामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात असून काही राज्यांनी मात्र हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे, यादरम्यन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे कार्यकर्त्यांसोबत 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट पाहिला. यानंतर फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे.

मुलींचं शोषण करण्याचं षडयंत्र केलं जातं आहे. धर्माचा दुरुपयोग केला जात आहे. या सगळ्या गोष्टी सत्यकथेच्या माध्यमातून बाहेर आल्या आहेत.

मला वाटतं की हा सिनेमा स्टोरी सांगण्याकरिता नाही, तर जागृत करण्यासाठी आहे. यानंतर कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये म्हणून हा सिनेमा तयार झाला आहे.

हेही वाचा - Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

फडणवीसांचा जितेंद्र आव्हाडांना टोला

देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपट निर्मात्यांला जाहीररित्या फाशी दिली पाहीजे असं वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले की, हा सिनेमा पाहिल्यावर मी एकच गोष्ट म्हणेन की, जे लोकं या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी दिली पाहिजे असं बोलले त्यांच्या सडक्या मेंदूतल्या सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आली आहे, असं मी हा सिनेमा पाहिल्यावर म्हणेन.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, कायदा तर आहेच आणि तो कडक करावा लागेल. मात्र, त्याबरोबर समाजाचं एक नेटवर्क तयार करावं लागेल. कारण कायदा सगळ्या गोष्टी करू शकेल असं नाही. म्हणून जागरुकता आणणंही महत्त्वाचं आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT