devendra fadnavis give blessing to adipurush movie om raut prabhas kriti sanon SAKAL
मनोरंजन

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस Adipurush पाहणार, रिलीजपूर्वी सिनेमाला शुभेच्छा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिपुरुष सिनेमाला शुभाशीर्वाद दिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadnavis On Adipurush Movie: सध्या आदिपुरुष सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमा रिलीज व्हायला अवघा १ दिवस बाकी आहे.

सिनेमाची उत्कंठा शिगेला आहे. बॉलिवूड सेलीब्रिटींपासून अनेक राजकारणी आदिपुरुष सिनेमाला शुभेच्छा देत आहेत.

काहींनी तर तिकीट दान करण्याचा निर्णय घेतलाय. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिपुरुष सिनेमाला शुभाशीर्वाद दिल्या आहेत.

(devendra fadnavis give blessing to adipurush movie om raut prabhas kriti sanon)

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ते लॅपटॉपवर आदिपुरुष सिनेमाचा ट्रेलर बघत आहेत.

हे फोटो पोस्ट करून देवेंद्र फडणवीस लिहितात... "प्रभू श्री राम मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित चित्रपट 'आदिपुरुष' ला आशीर्वाद देवोत.

दिग्दर्शक, निर्माते आणि टीम #Adipurush ला चार्टबस्टर यशासाठी शुभेच्छा!" अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी आदिपुरुष सिनेमाला शुभेच्छा दिल्यात.

दरम्यान यापूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरने गरीब मुलांसाठी आदिपुरुषची दहा हजार तिकिटं खरेदी केली होती.

त्यानंतर काश्मिर फाईल्सचे निर्माते यांनी देखील आदिपुरुषची दहा हजार तिकीटं खरेदी केली होती. यासगळ्यात आणखी एक बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे प्रदर्शनापूर्वीच एक मोठा विक्रम ओम राऊत यांच्या आदिपुरुषनं आपल्या नावावर केला आहे.

११ जूनपासून आदिपुरुषचे अॅडव्हान्स बुकींग सुरु झाले आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बूकींगला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाचे तब्बल दीड लाख तिकिटं विकली गेली आहेत. असे सांगण्यात आले आहे.

ज्याची किंमत ही पाच कोटींच्या आसपास आहे. याचा अर्थ आदिपुरुषनं पहिल्याच आठवड्यातील अॅडव्हान्स बुकींगमधून पाच कोटींची कमाई केली आहे.

आदिपुरुष हा येत्या शुक्रवारी (१६ जून) भारतात पाचपेक्षा अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान, प्रभास, क्रिती सेनॉन, सनी सिंह आणि देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

प्रभासनं या चित्रपटामध्ये भगवान श्रीराम यांची तर क्रितीनं सीतेची भूमिका साकारली आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT