devmanus 2 fame kiran dange shared emotional video about his exit in serial bajya last scene  sakal
मनोरंजन

'देवमाणूस' मालिकेतून बजाची एक्झिट.. असा शूट झाला शेवटचा भावनिक सीन..

'बजा'ची भूमिका करणाऱ्या अभिनेता किरण डांगेची भावनिक पोस्ट..

नीलेश अडसूळ

झी मराठी (zee marathi) वरील देवमाणूस (Devmanus)या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. एवढेच नव्हे तर 'देवमाणूस 2'या दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. डॉ. आजितकुमारचा खरा चेहरा कधी समोर येणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे. अशातच एक भावनिक प्रसंग मालिकेत आला आहे. ते म्हणजे आजवर अजितकुमारला देवमाणूस मानणाऱ्या बजाची मालिकेतून एक्झिट होणार आहे. त्याचा शेवटचा भाग नुकताच चित्रित झाला असून त्याचा भावनिक व्हिडिओ बजाने म्हणजेच अभिनेता किरण डांगे याने शेयर केला आहे. (devmanus 2 fame kiran dange shared emotional video about his exit in serial bajya last scene)

'देवमाणूस 2' ही मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे. अजितकुमार देव उर्फ देवी सिंग उर्फ नटवर सिंगचं पितळ लवकरच उघडं पडणार आणि त्याला शिक्षा होणार असं दिसत आहे. आता मालिकेत एक मोठा ट्वीस्ट आला आहे. मालिकेतून बजाची म्हणजेच अभिनेता किरण डांगेची एक्झिट होणार आहे. ज्या बजाने अजितकुमारला देवमाणूस बनवलं त्याच बजाचा खून होणार आहे. अजितकुमार उर्फ देविसिंग कोण आहे, त्याने किती खून केले आहेत हे सत्य बजाला समजतं, त्यामुळे आता आजिरकुमारने त्याचाही काटा काढला आहे. हा प्रसंग लवकरच मालिकेत दिसणार असून किरण डांगेचा शेवटचा सीन नुकताच शूट करण्यात आला.

किरणसाठी हा अत्यंत भावुक असा क्षण होता. या मालिकेमुळं तो खऱ्या अर्थानं घराघरांत पोहोचला आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम मिळालं. या चित्रीकरणाचा एक व्हिडओ बजाने शेयर केला आहे. यावेळी नाम्याने बजाला कडकडून मिठी मारल्याचं आपल्याला दिसतं. मालिकेत नाम्या-बज्याची मैत्री किती घट्ट होती ते आपण पाहिलंच. त्यामुळे त्यातला एक दोस्त गेल्याने प्रेक्षकही भावूक होणार आहेत. विशेष म्हणजे मालिकेत खास दोस्त असलेले हे दोघं खऱ्या आयुष्यातही बेस्ट फ्रेंड आहेत. त्यामुळं बज्या शेवटचा सीन शूट करत असताना नाम्याही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT