kiran gaikwad 
मनोरंजन

अखेर देवमाणसाचा होणार अंत

१५ ऑगस्ट रोजी दोन तासांचा विशेष भाग

स्वाती वेमूल

झी मराठीवरील देवमाणूस Devmanus या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेचं कथानक तसंच त्यातील व्यक्तिरेखा या सगळ्यावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने Kiran Gaikwad एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. प्रेक्षकांची ही लाडकी मालिका आता त्यांचा निरोप घेणार असून त्या जागी 'ती परत आलीये' ही सस्पेन्स थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जवळपास वर्षभर देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेला निरोप देताना वाईट वाटणं साहजिक आहे. पण प्रेक्षकांसाठी या मालिकेचा शेवट १५ ऑगस्ट रोजी २ तासांच्या विशेष भागात सादर केला जाणार आहे. डॉ. अजितकुमार देव याचा मुखवटा अखेरीस आता उतरणार असून त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. डॉक्टर हा देवीसिंग आहे हे आता सगळ्यांना कळणार आहे. ही मालिका आणि देवीसिंगची भूमिका खूप जवळची असल्यामुळे या मालिकेला निरोप देताना मन भरून आलं अशा भावना अभिनेता किरण याने व्यक्त केल्या.

मालिकेबद्दल बोलताना किरण म्हणाला, "देवमाणूस या मालिकेने माझी एक वेगळी ओळख निर्माण केली. हा कार्यक्रम आणि माझी त्यातील भूमिका ही नेहमीच माझ्या जवळची राहील कारण या भूमिकेने मला प्रेक्षकांचं अफाट प्रेम आणि पाठिंबा मिळवून दिला. ही मालिका जरी प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी या मालिकेने त्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे जे अढळ आहे. सध्या डॉक्टर अजितकुमारच्या भूमिकेला जरी पूर्णविराम लागला असला तरी पुन्हा एकदा वेगळं काहीतरी घेऊन मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होईन. तो पर्यंत प्रेक्षकांनी अजितकुमारवर प्रेम करत राहाव आणि हा विशेष भाग जरूर पाहावा." देवमाणसाचा अंत हा २ तासांचा विशेष भाग १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather IMD Alert : राज्यासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे! मुंबईसह 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, कसं असणार हवामान?

Gold & Silver Prices : दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण, पण पुन्हा सोन्याचे दर वाढणार

Throat Irritation: प्रदूषणामुळे जर घसा खवखवत असेल तर करा 'हे' ५ घरगुती उपाय

Teacher Transfer: राज्यातील १२ हजार शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत आंतरजिल्हा बदली रखडली, राज्यव्यापी आंदोलनाची तयारी

VIDEO : बाईकला धडकून स्लीपर बस पेटली, २० जण जिवंत जळाले; ४० जण करत होते प्रवास...

SCROLL FOR NEXT