pearl v puri and asaram bapu  Team esakal
मनोरंजन

'अभिनेत्याला जामीन मिळतो, मग आसाराम बापूंना का नाही' ? भक्त चिडले

भक्तांनी आता व्टिटरवर 'अॅक्टर को बेल संत को जेल' नावाचा हॅशटॅगही सुरु केला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - नागिन फेम अभिनेता पर्ल वी पुरी (pearl v puri)काही दिवसांपासून सोशल (social media) मीडियावर चर्चेत आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. याबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटी त्याच्या मदतीला आले आहेत. त्यांनी त्याला सपोर्टही केला आहे. पर्लनं दोनवेळा जामीनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयानं फेटाळला. त्याच्या तिस-या अर्जावर न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. (devotees of asaram bapu angry over pearl v puri getting bail post on social media )

जेव्हा पर्लला जामीन मंजूर झाला त्यानंतर आसाराम बापूंच्या भक्तांनी पर्लला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका अभिनेत्याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जामीन मिळाला आहे. तर मग आसाराम बापूंना (asaram bapu) का नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सध्या हा विषय सोशल मीडियावर ट्रेडिंग होताना दिसतो आहे. पर्लला 4 जून रोजी अटक करण्यात आली होती. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टानं सुनावली होती. मात्र त्याला अकरा दिवसांनंतर जामीन मिळाला आहे.

एकीकडे पर्लच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी आसाराम बापूंच्या भक्तांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राग व्यक्त केला आहे. त्यांनी व्टिटरवर वेगवेगळ्या प्रकारे मीम्स शेअर करुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या पोस्टमध्ये भक्तांनी असे म्हटले आहे, पॉस्को अॅक्टनुसार आसाराम बापूंना गेल्या आठ वर्षांमध्ये एकदाही जामीन मिळालेला नाही. आणि अभिनेता पर्ल पुरीला एवढ्या लवकर जामीन मिळाला. अशा प्रकारे आसाराम बापूंच्या भक्तांच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

भक्तांनी आता व्टिटरवर अॅक्टर को बेल संत को जेल नावाचा हॅशटॅगही सुरु केला आहे. पर्ल वर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मात्र ज्यांनी त्याच्यावर आरोप केला होता त्या मुलीच्या आईनं काही दिवसांपूर्वी त्या आरोपांचे खंडन केले होते. त्याची पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: 'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT