Dharmaveer2: Esakal
मनोरंजन

Dharmaveer2: आनंद दिघे स्मृतीदिनानिमित्त धर्मवीर 2 ची ठाणे टेंभी नाक्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठी घोषणा..

Vaishali Patil

Dharmaveer 2: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांना शनिवारी स्मृतीदिनानिमित्त अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याच्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी त्यांच्या स्मृतीस वंदन केले. त्यातच आता काही दिवसांपुर्वी त्याच्या जीवनावर आधारित धर्मवीर या मराठी सिनेमाचा पुढचा भाग देखील आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

धर्मवीर-2 या मराठी सिनेमाची घोषणा काही दिवसांपुर्वी करण्यात आली होती आता आनंद दिघे स्मृतीदिनानिमित्त चित्रपटाच्या टिमने या सिनेमाची अधिकृत घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या टिमने आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला भेट दिली. सिनेमाची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली.

धर्मवीर 2 ची घोषणा निर्माते मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत याबद्दल माहिती दिली.

या पोस्टमध्ये फोटो शेयर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त आज धर्मवीर २ चित्रपटाच्या टीमने साहेबांच्या शक्तीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले आणि धर्मवीर २ चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.

याप्रसंगी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी चित्रपटाच्या टीमला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते श्री.मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, अभिनेता प्रसाद ओक, क्षितीज दाते आणि तंत्रज्ञ टीम उपस्थित होती."

यापुर्वी देखील जेजुरीच्या खंडोबाचा आशिर्वाद घेऊन धर्मवीर 2 ची घोषणा निर्माते मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी केली होती.

पोस्ट शेयर करत त्यांनी लिहिले की, अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा आता प्रत्यक्षात उतारणार.... सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादने 'धर्मवीर 2' ची आज मी अधिकृत घोषणा करत आहे. "धर्मवीर २' मधून उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..."

पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल. आता त्याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT