dharmaveer 2 announcement directed by pravin tarde prasad oak based on life anand dighe shivsena drj96 SAKAL
मनोरंजन

Dharmaveer 2: खंडोबाचा आशिर्वाद घेऊन धर्मवीर 2 ची मोठी घोषणा; आता साहेबांचं हिंदुत्व उलगडणार

साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट.. अशी टॅगलाईन देत धर्मवीर 2 ची घोषणा झालीय.

Devendra Jadhav

Dharmaveer 2 Announcement News: प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर सिनेमा प्रचंड गाजला. आ़ता सर्वांना उत्सुकता आहे धर्मवीर 2 सिनेमाची. अखेर आज धर्मवीर 2 ची घोषणा झालीय.

साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट.. अशी टॅगलाईन देत धर्मवीर 2 ची घोषणा झालीय. जेजुरीच्या खंडोबाचा आशिर्वाद घेऊन धर्मवीर 2 ची घोषणा निर्माते मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी केली

धर्मवीर 2 बद्दल निर्माते मंगेश देसाई म्हणतात...

धर्मवीर 2 ची घोषणा झाल्यावर निर्माते मंगेश देसाई म्हणतात.. "धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र सगळ्या जनतेसमोर आलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब यामाध्यमातून सर्व जगात पोहोचले आणि 'असा माणूस होणे नाही' हेही सर्वांना समजलं. त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, म्हणूनच 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे - भाग 2 ह्याचं चित्रीकरण आम्ही सुरू करतोय, लवकरच...बघुया धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, लवकरच... "

धर्मवीर 2 ची घोषणा...

दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी पोस्टर शेअर करत धर्मवीर 2 ची घोषणा केलीय. "अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा आता प्रत्यक्षात उतारणार.... सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादने 'धर्मवीर 2' ची आज मी अधिकृत घोषणा करत आहे. "धर्मवीर २' मधून उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..." असं कॅप्शन देत धर्मवीर 2 ची घोषणा झालीय.

प्रसाद ओक पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या भुमिकेत

पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल! 

या निमित्ताने आनंद दिघे नामक ज्वलंत व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर साकारणारा अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येईल.

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे असून, पहिल्या भागातील कलाकारांची तगडी फौज दुसऱ्या भागात देखील आपापल्या व्यक्तिरेखेला न्याय देताना दिसून येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: कागलमध्ये समेट! हसन मुश्रीफांच्या सून बिनविरोध; शिंदे गटाने घेतली माघार

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Post Office : तुम्हाला वर्षभरात लखपति बनवू शकते पोस्टाची ही स्कीम! थोडीशी गुंतवणूक करून झटपट व्हाल श्रीमंत?

Video: प्राजक्ता–गश्मीर पुन्हा एकत्र येणार? व्हिडिओ शेअर करत केल्या मोठ्या घोषणा, म्हणाले...'फुलवंतीनंतर आता...'

SCROLL FOR NEXT