dharmaveer 2 bts of eknath shinde role played by kshitish date prasad oak  SAKAL
मनोरंजन

Dharmaveer 2: 'धर्मवीर 2' मध्ये एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याने शेअर केली शूटींगची झलक

धर्मवीर 2 मध्ये क्षितीश दाते पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार आहे

Devendra Jadhav

Dharmaveer 2 News: धर्मवीर 2 सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांपुर्वी सिनेमाचा मुहुर्त सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुहुर्ताचा क्लॅप दिला.

अशातच धर्मवीर 2 मध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दातेने सिनेमाच्या सेटवरील खास कॅमेरामागचे क्षण सर्वांसाठी शेअर केलेत

धर्मवीर 2 मध्ये क्षितीश पुन्हा एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत

धर्मवीर च्या पहिल्या भागात आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांंच्यातलं खास नातं बघायला मिळालं. धर्मवीर 2 मध्ये पुन्हा एकदा क्षितीश दाते एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

क्षितीशने धर्मवीर 2 च्या सेटवरील काही खास क्षण सर्वांसोबत शेअर केलेत. यात क्षितीश सेटवर स्क्रीप्ट वाचताना, आनंद दिघेंच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओकशी गप्पा मारताना, याशिवाय दिग्दर्शक प्रवीण तरडेंशी चर्चा करताना दिसतोय.

धर्मवीर 2 चा मुहूर्त सोहळा

धर्मवीर 2 सिनेमाच्या शुटींगचा मुहूर्तसोहळा काही दिवसांपुर्वी पार पडला. यावेळी आनंद दिघेंच्या तसबिरीला वंदन करण्यात आलं. आणि अंबेमातेची आरती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी आनंद दिघेंसमोर हात जोडले आणि आरती केली.

धर्मवीर २ च्या शुटींग मुहूर्ताला अभिनेता प्रसाद ओक, सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई उपस्थित होते. सर्व कलाकारांनी प्रार्थना करुन सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली.

या दिवशी धर्मवीर 2 येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'धर्मवीर'च्या पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल!

"धर्मवीर 2' मधून उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..." असं कॅप्शन देत 'धर्मवीर 2' ची घोषणा झाली. हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane New Journey: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! म्हणाला, क्रिकेटने मला भरपूर काही दिलं, आता...

Missing Link Accident: पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंकवर येताच होत्याचं नव्हत झालं; पुण्यातील युवा काँग्रेस नेत्याचा मृत्यू, मध्यरात्री काय घडलं?

Marathi News Live Updates : पंतप्रधानांशी महाराष्ट्राचा विकास व इतर संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली- एकनाथ शिंदे

Raju Shetty: ६० वर्षांचा वनवास संपवा! पवना धरणग्रस्त आक्रमक; राजू शेट्टींचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा

Mumbai Indians च्या ताफ्यात 'हे' ४ खेळाडू घेऊ शकतात हार्दिक पांड्याची जागा! CSK, KKR सोडून अन्य पर्यायाचा विचार; कोण आहेत ते?

SCROLL FOR NEXT