Dharmaveer 2 muhurta pooja attend director pravin tarde prasad oak SAKAL
मनोरंजन

Dharmaveer 2: मुख्यमंत्री शिंदेंनी केलं आनंद दिघेंना वंदन, धर्मवीर 2 च्या शुटींगला सुरुवात

धर्मवीर २ च्या शुटींगला सुरुवात झालीय

Devendra Jadhav

Dharmaveer 2 News: धर्मवीर २ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. २०२२ ला आलेल्या धर्मवीर सिनेमाने बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी केली. धर्मवीर सिनेमात आनंद दिघेंची कहाणी पाहायला मिळाली. आनंद दिघेंच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे सिनेमात पाहायला मिळाले.

आज धर्मवीर २ ची सुद्धा घोषणा झालीय. धर्मवीर २ चा मुहूर्तसोहळा आज पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

धर्मवीर २ चा मुहूर्त सोहळा

धर्मवीर २ सिनेमाच्या शुटींगचा मुहूर्तसोहळा पार पडला. यावेळी आनंद दिघेंच्या तसबिरीला वंदन करण्यात आलं. आणि अंबेमातेची आरती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी आनंद दिघेंसमोर हात जोडले आणि आरती केली.

धर्मवीर २ च्या शुटींग मुहूर्ताला अभिनेता प्रसाद ओक, सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई उपस्थित होते. सर्व कलाकारांनी प्रार्थना करुन सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली.

धर्मवीर 2 ची घोषणा...

दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी यांनी काही दिवसांपुर्वी पोस्टर शेअर करत धर्मवीर 2 ची घोषणा केलीय. "अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा आता प्रत्यक्षात उतारणार.... सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादने 'धर्मवीर 2' ची आज मी अधिकृत घोषणा करत आहे.

पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल!

"धर्मवीर २' मधून उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..." असं कॅप्शन देत धर्मवीर 2 ची घोषणा झाली. हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT