Dharmendra and Saira Banu in Saazish. Google
मनोरंजन

सायरा बानो यांनी होकार दिला अन् धर्मेंद्र फसले;काय घडलं होतं?

धर्मेंद्र आणि सायरा बानो यांच्यात आजही खूप घट्ट मैत्री पहायला मिळते.

प्रणाली मोरे

धर्मेंद्र(Dharmendra) यांनी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे,जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्या स्टोरीत त्यांनी १९७५ सालच्या त्यांच्या 'साजिश' या सिनेमातील त्यांच्या सहकलाकार सायरा बानो(Saira Banu) यांच्याविषयी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणालेयत,''त्यांना 'साजिश' सिनेमात काम करायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी सायरा बानो यांनी स्वतःहून सिनेमाला नकार द्यावा यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यात त्यांना अपयश आलं जेव्हा सायरा बानो यांनी साजिश सिनेमात काम करण्यासाठी होकार कळवला''. धर्मेंद्र यांनी ट्वीटरवर यासंदर्भात आपली स्टोरी सांगताना 'साजिश'(Saazish) सिनेमातलं एक गाणं देखील शेअर केलंय. पण नेमकं का धर्मेंद्र यांना हा सिनेमा करायचा नव्हता? काय होतं कारणं? चला जाणून घेऊया.

धर्मेंद्र यांनी 'वो बडे खुशनसीब होते है...' हे गाणं शेअर केलं आहे. ज्यात ते हॉंगकॉंगच्या रस्त्यावर मोटरसायकल चालवताना दिसत आहेत. सायरा बानो त्यांच्या पाठी गाडीवर बसल्या आहेत आणि हॉंगकॉंग शहरात गाणं गात ते दोघे राइडचा आनंद घेताना दिसत आहेत. १९७५ सालातलं हॉंगकॉंग शहर त्या व्हिडीओत दिसत आहे. धर्मेंद्र यांनी या सिनेमाची आठवण सांगताना लिहिलंय,''मित्रांनो,मला हा सिनेमा खरंतर करायचा नव्हता. त्यामुळे मी निर्मात्याला नकार कसा देणार पुढे जाऊन अडचण झाली असती. त्यामुळे त्याच्यासोबत माझं नातं बिघडू नये म्हणून मी त्याला अट घातली की या सिनेमात सायरा बानोला घे. ती तयार असेल तर करुया सिनेमा. त्यावेळी सायरा सिनेमांत प्रचंड व्यस्त असायची. मला वाटलं सायरा नाही म्हणेल पण तिनं आनंदानं होकार कळवला आणि मी लढवलेली शक्कल पाण्यात गेली. इतकंच नाही तर तिनं मला कळवलं की,''धरम,मी हा सिनेमा तुझ्यासाठी करतेय''. आता मी यावर काय बोलणार होतो''. धर्मेंद्र यांची ती ट्वीटर स्टोरी आम्ही बातमीत जोडली आहे.

'साजिश' हा सिनेमा कालिदास जे यांनी दिग्दर्शित केला होता. धर्मेंद्र या सिनेमात कार रेसर दाखवले आहेत,जो खरा एक गुप्तहेर असतो. सायरा बानो सिनेमात सौंदर्यस्पर्धा जिंकलेल्या सौंदर्यवती दाखवण्यात आल्या आहेत. हा सिनेमा १९७५ साली 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी प्रदर्शित झाला होता. 'वो बडे खुशनसीब होते है' हे गाणं सुमन कल्याणपूर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. धर्मेंद्र आणि सायरा बानो हे दोघे आजही खूप चांगले मित्र आहेत. गेल्या वर्षी दिलिप कुमार यांच्या निधनाच्या वेळी धर्मेंद्र या वयातही त्यांचं अंतिम दर्शन घ्यायला गेले होते. त्यावेळी सायरा त्यांच्याशी काय बोलल्या हे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यांनी खूप भावूक पोस्ट दिलिप कुमार यांच्या निधनानंतर शेअर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT