dharmendra
dharmendra 
मनोरंजन

अभिनेते धर्मेंद्र म्हणतायेत, 'मी बोरिंग होत चाललोय'

सकाळवृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सध्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या फार्महाऊसवर वेळ घालवत आहेत. वयाच्या वाढत्या वयोमानानुसार त्यांनी सिनेमापासून स्वतःला दूर ठेवलं. मात्र असं असलं तरीही चाहत्यांचं त्यांच्यावरिल प्रेम कमी झालेलं नाही. धर्मेंद्र सोशल मिडियावर त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच ऍक्टीव्ह असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मिडियावर शेअर करत त्यांचे अपडेट्स देत असतात.  धर्मेंद्रच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात चाहते लाईक करत असतात. नुकताच धर्मेंद्र यांनी सोशल मिडियावर एका मजेशीर कॅप्शनसोबत एक जुना फोटो पोस्ट केला आहे. 

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी लिहिलं आहे की, 'संवेदनशील आहे. कधी कधी विचार करतो मी की बोरिंग होत चाललो आहे.' धर्मेंद्रच्या या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी अनेक चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. यात चाहत्यांसोबतंच बॉलीवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे.

धर्मेंद्र यांचा हा फोटो त्यांच्या तरुणपणातील आहे. यात फोटोमध्ये धर्मेंद्र यांचा हँडसम लूक चाहत्यांना प्रेमात पाडतोय. या फोटोमध्ये ते कसला तरी विचार करत आहेत असंच दिसतंय. चाहत्यांच्या कमेंट्सवरुन बॉलीवूडचे ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांची क्रेझ चाहत्यांमध्ये जराही कमी झालेली नाही. 

धर्मेंद्र सध्या मुंबईपासून दूर त्यांच्या फार्महाऊसवर वेळ घालवत आहेत. ते नेहमीच त्यांच्या फार्महाऊसवरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.  गाई-गुरांसोबतचे त्यांचे व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलेच हिट ठरतायेत. लोकांना त्यांचं निसर्गाच्या सान्निध्यात राहणारं जीवन खूप आवडतंय. त्यामुळे लॉकडाऊन असतानाही ते त्यांच्या चाहत्यांसोबत जोडले गेले आहेत. 

dharmendra shared his throwback picture and says main boring ho chala hoon  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT