Dharmendra Google
मनोरंजन

Dharmendra: 'स्ट्रगलिंग अभिनेत्यासारखं का करताय..',युजरनं खिल्ली उडवताच भडकले ८७ वर्षाचे धर्मेंद्र,म्हणाले..

धर्मेंद्र यांनी ट्वीटरवर आपल्या नव्या वेबसिरीजमधील लूक सोशल मीडियावर शेअर केला होता,तेव्हा त्यांना ट्रोल करण्यात आलं.

प्रणाली मोरे

Dharmendra: धर्मेंद्र आज ८७ वर्षांचे असले तरी भलतेच सक्रिय पहायला मिळतात. या वयात सिनेमात काम करण्यासोबतच ते सोशल मीडियावर देखील सुपर अॅक्टिव्ह पहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांनी 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड'मधील आपला सूफी संत शेख सलीम चिश्ती यांच्या लूकमधील फोटो शेअर केला.

धर्मेंद्र पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहतात. नुकत्याच केलेल्या त्या फोटो पोस्टवरनं एवढ्या मोठ्या दिग्ग्ज अभिनेत्याला ट्रोल केलं गेलं. पण धर्मेंद्रच ते..त्यांनी मोठ्या प्रेमानं त्या ट्रोलर्सची बोलती बंद केली,जेव्हा त्यानं धर्मेंद्र यांना स्ट्रगलिंग अभिनेता म्हटलं. (Dharmendra Shuts troller who questioned why he was behaving like struggling actor as he shares first look from taj divided by blood)

धर्मेंद्र वयाच्या ८७ व्या वर्षी डिजिटल विश्वात पदार्पण करत आहेत. 'ताज-डिव्हायडेड बाय ब्लड' या वेब सिरीजमधून धर्मेंद्र ओटीटीवर पदार्पण करत आहेत. याविषयीची माहिती स्वतः धर्मेंद्र यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरनं दिली.

धर्मेंद्र वेब सीरिज मध्ये सूफी संत शेख सलीम चिश्ती यांची व्यकितरेखा साकारत आहेत.यामधील आपला लूक शेअर करत धर्मेंद्र यांनी ट्वीटरवर लिहिलं,'' मित्रांनो,मी 'ताज-डिव्हायडेड बाय ब्लड' मध्ये सूफी संत शेख सलीम चिश्ती यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. छोटी भूमिका आहे,पण महत्त्वाची आहे. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हवा आहे''.

धर्मेंद्र यांच्या या ट्वीटला सोशल मीडियावर लोकांची वाहवा मिळत आहे. पण यादरम्यान ट्वीटरवर नेटकऱ्यानं धर्मेंद्र यांच्या ट्वीटला कोट करत लिहिलं आहे,'एका स्ट्रगलिंग अभिनेत्यासारखं का वागताय?'

यावर धर्मेंद्र यांनी उत्तर देत लिहिलं आहे की,''वैष्णवजी, आयुष्य एक सुंदर स्ट्रगल आहे. तुम्ही,मी..प्रत्येकजण इथं स्ट्रगल करत असतो. आराम करण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आपल्या सुंदर स्वप्नानांना स्वतःच्या हातानं मारून टाकता''.

धर्मेंद्रच्या या ट्वीटवर अनेकांनी आपलं सहमत दर्शवलं आहे.

धर्मेंद्र यांनी भले आता 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' वेबसिरीजमध्ये आपण दिसणार असल्याचं जाहिर केलं आहे, तरी यासोबतच त्यांचे चाहते आता उत्सुक आहेत त्यांना 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात पाहण्यासाठी.

या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासोबत रणवीर सिंग,आलिया भट्ट,शबाना आझमी आणि जया बच्चन देखील नजरेस पडणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन करण जोहरनं केलं आहे. सिनेमातील शूट दरम्यानचे काही फोटो-व्हिडीओ याआधीच व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT