Jawan Shah Rukh Khan Movie Broke All Records  Esakal
मनोरंजन

Dharmendra On Jawan: "शाहरुख माझ्या बाळा..." जवान रिलीजपुर्वीच धर्मेंद्रची किंग खानसाठी खास पोस्ट चर्चेत

Dharmendra On Jawan: पठाणच्या यशानंतर शाहरुख जवान चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर एंट्री करणार आहे.

Vaishali Patil

Dharmendra On Shah Rukh Khan Jawan: बॉलिवूड अभिनेता किंग खान हा सध्या त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा बहूप्रतिक्षीत चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी केवळ शाहरुख खानच नाही तर त्याचे चाहतेही खुप उत्सूक आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते या सिनेमाची वाट पाहत होते. पठाणच्या यशानंतर शाहरुख जवान चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर एंट्री करणार आहे.

या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर याला देखील प्रेक्षकांनी खुप प्रेम दिले आहे. त्याच बरोबर चित्रपटाच्या अॅडवान्स बुकिंगला ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आकडेवारीनुसार शाहरुखचा जवान हा पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग करु शकतो अशा चर्चा आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटलीने केले आहे. यात शाहरुख अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. अनेक कलाकारांनी या चित्रपटासाठी शाहरुखला शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यात आता ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील शाहरुख खानच्या जवानसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे. हि-मॅनने किंग खानसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी लिहिले की, "शाहरुख मुला तूला जवानसाठी अनेक शुभेच्छा." शुभेच्छा त्यांनी शाहरुखवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

धर्मेंद्र हे नुकतेच रॉकी और राणी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसले होते. त्यांच्या भुमिकेचे खुप कौतुक करण्यात आले. त्याचबरोबर चित्रपटातील त्याच्या किसींग सीनचीही बरिच चर्चा रंगली होती. त्यानंतर ते त्याचा मुलगा सनी देओलच्या गदर 2 या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती. आता शाहरुखच्या जवान चित्रपटाबाबत ट्विट शेयर करत ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सोशल मीडियावर धर्मेंद्र आणि शाहरुख खानचा हा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. नेटकरी दोघांच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. त्याचबरोबर कमेंट करत दोघांनी एकत्र चित्रपटात काम करावं अशी इच्छाही व्यक्त केली आहे.

शाहरुखच्या जवानमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत.

'पठाण' नंतर 'जवान' हा शाहरुखचा दुसरा चित्रपट आहे. 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT