Dharmendra Esakal
मनोरंजन

Dharmendra viral video: 87 वर्षाच्या धर्मेंद्रनी चक्क पाण्यात केलं एरोबिक्स.. व्हिडीओ पाहून नेटकरी गारठले

आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्तानं धर्मेंद्र यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवर शेअर केलेला व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Dharmendra viral video:1960 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरवात केलेल्या धर्मेंद्र यांनी तब्बल तीन दशकं बॉलीवूडवर राज्य केलं. धर्मेंद्र वयाच्या 87 व्या वर्षी देखील फिट आहेत आणि सक्रिय देखील आहेत.

धर्मेंद्र यांनी आधुनिक जगासोबत मैत्री केल्याचं दिसून येतं जेव्हा ते सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. धर्मेंद्र आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी या पोस्ट्सच्या माध्यमातून शेअर करताना दिसतात. ते या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जो पाहून जो तो हैराण होताना दिसत आहे.(Dharmendra's swimming video stuns netizen Viral Video)

धर्मेंद्र यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर आपला हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला पाहिल्यानंतर वाटत आहे की धर्मेंद्र पुन्हा एकदा अॅक्शन हिरो म्हणून कमबॅक करतायत की काय. व्हिडीओत पाण्यामध्ये ते एरोबिक्स करताना दिसत आहेत. धर्मेंद्र यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्तानं हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करत धर्मेंद्र यांनी लिहिलं आहे-''मित्रांनो..आज आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्तानं माझ्यात एनर्जी आली आहे..मी आज संध्याकाळपासून वॉटर एरोबिक्स सुरू केलं आहे. पाण्यामध्ये एरोबिक्स करण्यात एक वेगळाच आनंद आहे. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडीओ नक्की आवडेल''

.सोशल मीडियावर नेटकरी धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ पाहून त्यांच्या हिमतीला दाद देताना दिसत आहेत. त्यांच्यावर कौतूकाचा वर्षावही करत आहेत. स्विमिंग पूल मधील धर्मेंद्र यांचा एरोबिक्स अवतार सगळ्यांनाचा भूलवताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT