dia mirza 
मनोरंजन

प्रदुषणामुळे पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर परिणाम; दिया मिर्झा म्हणते, "आता तरी.."

सकाळ ऑनलाइन

प्रदूषण हा अत्यंत गंभीर मुद्दा असून त्याच्याशी आपल्या विविध आरोग्य समस्या जोडलेल्या आहेत. प्रदूषणाचे परिणाम गरोदर स्त्रिया, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर त्वरित दिसून येतात. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की, हवा प्रदूषणाचा परिणाम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज जाऊ शकतो. प्रदूषणासारख्या विषयावर आजवर अनेकांनी आवाज उठवला आणि त्यासाठी कामसुद्धा केलं. अनेक सेलिब्रिटीसुद्धा प्रदूषणाच्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती करताना दिसतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी म्हणजे अभिनेत्री दिया मिर्झा. निसर्ग, वन्यजीव, प्रदूषण यांसारख्या मुद्द्यांवर दिया नेहमीच मोकळेपणाने व्यक्त झाली. सध्या दियाने याच बाबतीत केलेलं एक ट्विट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. प्रदूषणाविषयी आलेल्या एका संशोधन लेखावर तिने हे ट्विट केलं आहे. हवामान बदलाला मान्य न करणाऱ्यांना दियाने तिच्या ट्विटमधून उपरोधिक टोला लगावला आहे. 

प्रदूषणाचा पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर काय परिणाम होतो, यासंदर्भातला एक संशोधन लेख तिने ट्विटरवर रिट्विट केला आहे. त्याचसोबत तिने लिहिलं, 'कदाचित आतातरी लोकं हवामान बदल आणि हवा प्रदूषणासारख्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहतील.'

दियाने डॉ. शन्ना स्वॅन यांचा एक लेख रिट्विट केला आहे. या लेखात प्रदुषणाचा पुरुषांच्या आणि नवजात बालकांच्या गुप्तांगावर काय दुष्परिणाम होतो, यावर माहिती देण्यात आली आहे. "प्लास्टिक तयार करण्यासाठी phthalates हे केमिकल वापरलं जातं. मात्र हेच केमिकल मानवाच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतंय. यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलनही बिघडतंय. प्रदूषणामुळे नवजात बालकांच्या लैंगिक अवयवांमध्ये दोष आढळत असून अनेक मुलांच्या गुप्तांगाचा आकार हा सामान्य आकारमानापेक्षा कमी असल्याचं आढळलं आहे", असं डॉ. शन्ना स्वॅन यांनी त्यांच्या या लेखात लिहिलंय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी संस्थाचा मोठा निर्णय; मंदिर २४ तास भक्तांसाठी खुलं राहणार!

SCROLL FOR NEXT