dia mirza 
मनोरंजन

इतरांपेक्षा वेगळं! लग्नविधीत दियाचा महत्त्वाचा निर्णय; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

स्वाती वेमूल

पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे लक्षात येताच अभिनेत्री दिया मिर्झाने पाच वर्षांच्या संसाराला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये दियाने साहिल संघाला घटस्फोट दिला आणि नुकतीच तिने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी दियाने वैभव रेखी या व्यावसायिकाशी लग्नगाठ बांधली. दियाच्या या लग्नसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नुकतेच तिने सोशल मीडियावर या लग्नाची खास क्षणचित्रे चाहत्यांसोबत शेअर केली. त्यातल्याच एका फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या चर्चेमागचं कारणही तितकंच खास आहे. 

बहुतांश लग्नात विधी करण्यासाठी पुजारी हे पुरुषच असल्याचं पाहायला मिळतं. मात्र दियाने याच गोष्टीच्या बाबतीत वेगळेपण जपलं. दियाने पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये महिला पुजारी पाहायला मिळत आहेत. याच निर्णयासाठी तिच्यावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. 'तू खऱ्या अर्थाने स्त्रीवाद जगतेय', अशा शब्दात एकाने तिची स्तुती केली. तर पहिल्यांदाच महिला पुजारीला लग्न लावताना पाहिलंय, अशा शब्दांत दुसऱ्या नेटकऱ्याने आश्चर्य व्यक्त केलं. 

दियाने २०१४ मध्ये साहिल संघाशी लग्न केलं होतं. ११ वर्षांपासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते आणि पाच वर्षांचा दोघांचा संसार होता. साहिलचं नाव लेखिका कनिका ढिल्लनशी जोडलं जातंय. २०१९ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दियाच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम फुलू लागलं. लॉकडाउनदरम्यान दिया आणि वैभव लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं म्हटलं जातं. वैभवसोबतच्या नात्याची कल्पना दियाने कोणालाच लागू दिली नव्हती. अखेर १५ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधत दोघांनी हे नातं जगजाहीर केलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : देशातील पहिली डबल डेकर आणि एटीएम सुविधा असलेली ‘पंचवटी एक्सप्रेस’ आज ५० वर्षांची!

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT