Diana In Cannes esakal
मनोरंजन

Diana In Cannes : कान्स फेस्टिव्हलमध्ये डायना पेंटीचा डेब्यू, लूक पाहून चाहते घायाळ

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर इंडियन अभिनेत्रीसह जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी आपल्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांची मनं जिंकली

Anuradha Vipat

Diana In Cannes : 76 व्या आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक भारतीय अभिनेत्रीनी सहभाग घेतलाय. 16 मे पासून सुरू झालेला हा फेस्टीव्हल 27 मे पर्यंत चालणार आहे.

आत्तापर्यंत कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर इंडियन अभिनेत्रीसह जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी आपल्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांची मनं जिंकली आहेत. भारतीय अभिनेत्री डायना पेंटीने देखील फ्रेंच रिव्हिएरात सुरू असलेल्या या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली.

डायना पेंटीने याच वर्षी पहिल्यांदा कान्समध्ये डेब्यू केलाय. या अभिनेत्रीने आपल्या फॅशन सेन्सने एक वेगळी छाप सोडलीय. तिचा रेड कार्पेटवरील लूक पाहून जगभरातून तिचं कौतुक केलं जातंय. डायनाने तिच्या रेड कार्पेट लुकसाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडला. ड्रेसमध्ये प्लंगिंग व्ही नेकलाइन आणि बलून स्लीव्हसह क्रॉप केलेला ब्लेझर होता. तिने मॅचिंग धोती स्टाइल स्लिट ट्राउझर्स वेअर केला होता. तिचा ग्लॅम मेकअप लूक खूपच बोल्ड दिसत होता.

कान्समधील डेब्यू लूकही खास

फिल्म फेस्टिव्हलच्या फर्स्ट लूकमध्ये डायना पेंटीचे कौतुक करावे तितके कमी आहे. तिने फाल्गुनी आणि शेन पीकॉकचा सुंदर सोनेरी को-ऑर्डर घातला होता. तिने फिटेड लाँग स्कर्ट आणि गोल्ड थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कसह मॅचिंग क्रॉप टॉप घातला होता. तिच्या ड्रेसबद्दल सर्वात भारी गोष्ट म्हणजे डायनाचा पोशाख क्रिस्टल्सचा बनलेला होता.

कमीत कमी अॅक्सेसरीज

डायना पेंटीने सोनेरी ड्रेससह किमान अॅक्सेसरीज घातल्या होत्या. तिने यासोबत रिंग्स आणि इयररिंग्स घातल्या होत्या. यासोबत तिने ग्लीटरी आयशॅडो, स्लीक बॅक आयलाइनर, ब्राँझ ब्लश आणि न्यूड लीप कलर लावला होता.

काळ्या सिक्विन ड्रेसमध्ये डायना

डायना पेंटीचा हा लूकही खूप वेगळा होता. ब्लॅक सिक्विन शॉर्ट ड्रेसमध्ये डायना खूपच ग्लॅमरस दिसत होती. तिचा ड्रेस फिलिप प्लेनने डिझाइन केलाय. तिच्या ड्रेसवर सगळीकडे काळ्या रंगाचे टँसेल्स होते. फुल स्लीव्ह आणि गोल नेकलाइनमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. गोल्ड इयररिंग्स आणि ब्लॅक हिल्स सोबत तिने हा लूक कॅरी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant: कोणालाही अपेक्षा नव्हती! पदभार घेताच CJI सूर्यकांतांचा निर्णय देश चकित करणारा, सर्वात मोठी समस्या संपणार?

Nagpur News : 'दैनिक नवप्रभात'च्या संपादकांच्या घराला लक्ष्य; अवैध धंद्याला विरोध केल्याने दगडफेक, काचा फुटल्या...

सचिन पिळगावकर की अशोक सराफ! कोण जास्त श्रीमंत? संपत्तीत कोण आहे पुढे?

Farmer Success Story: 'धुमाळवाडीच्या द्राक्षांना आखाती देशात भाव'; फळबाग लागवडीत वृद्ध शेतकऱ्याची किमया, वर्षाकाठी ५० लाखांची कमाई !

Satara News: 'मद्यधुंद युवतीचा धिंगाणा': कऱ्हाड- चिपळूण रस्त्यावरील घटना; वाहनांच्या रांगा, नशा चडली अन्..

SCROLL FOR NEXT