Did Neetu Kapoor Take An Indirect Dig At Kangana Ranaut After She Called Ranbir Kapoor & Alia Bhatt’s Marriage Fake?  SAKAL
मनोरंजन

Neetu Kapoor Post: कपूर कुटूंबात वादळ? नीतू कपूर यांच्या पोस्टने चर्चांना उधाण, लोकांनी आलीयाकडे बोट दाखवलं

कपूर कुटूंबात कौटुंबिक कलह झालाय का? अशा चर्चा रंगल्या आहेत. याचं कारण म्हणजे नीतू कपूरने एक पोस्ट शेअर केलीय

Devendra Jadhav

Neetu Kapoor Cryptic Post News: कपूर कुटूंब हे बॉलीवुडमधलं सगळ्यात फेवरेट आणि चर्चेत असलेलं कुटूंब. कपूर कुटूंब कायम एकमेकांची साथ देताना दिसतं. कोणता सण असो, पार्टी असो किंवा पुरस्कार सोहळा असो.. कपूर कुटूंब कायम एकत्र दिसतं.

पण याच कपूर कुटूंबात कौटुंबिक कलह झालाय का? अशा चर्चा रंगल्या आहेत. याचं कारण म्हणजे नीतू कपूरने एक पोस्ट शेअर केलीय, त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलंय.

(Did Neetu Kapoor Take An Indirect Dig At Kangana Ranaut After She Called Ranbir Kapoor & Alia Bhatt’s Marriage Fake?)

काय आहे नीतू कपूर यांची पोस्ट

बुधवारी नीतू कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट पोस्ट केली. या पोस्टने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.

नीतु यांनी इन्स्टा स्टोरीनर असे लिहिले आहे की, 'आमची कुटुंबे आता पूर्वीसारखी एकत्र राहत नाहीत याचं कारण म्हणजे, जी मुल्यं कुटुंबाचे पालनपोषण करतात त्याच गोष्टींना आम्ही गाडतो. नीतू कपूरने यांनी पम्मी बक्षी गौतमची ही पोस्ट रिपोस्ट केली.

नीतू कपूर यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते नीतू कपूरचे कुटुंब तुटत आहे की काय असा अंदाज लावू लागले.

लोकांनी आलीयाकडे बोट दाखवलं

या पोस्टनंतर यूजर्स सोशल मीडियावर वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहेत. एवढेच नाही तर कोणीतरी आलिया भट्टला प्रश्न विचारत आहेत. युजर्स म्हणतात की, नीतू आणि आलिया आता सोबत नाहीत.

वास्तविक, नुकताच नीतू कपूरने तिचा ६५ वा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला. यादरम्यान रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर साहनी, तिचा पती भरत साहनी आणि मुलगी समायरा उपस्थित होते. मात्र आलिया आणि तिची लेक राहा दिसल्या नाहीत.

अशा परिस्थितीत आता युजर्स ही नोट नक्की कोणासाठी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आलिया भट्टसाठी लिहिले आहे का? असाही सवाल युजर्स उपस्थित करत आहेत

याआधी कंगनाने साधला रणबीर - आलीयावर निशाणा

अभिनेत्री कंगना रणौतने एका लोकप्रिय कपल्सविषयी लिहिताना त्यांनी केलेलं लग्न खोटं असल्याचे म्हटले आहे. ते जोडपं माझी भेट घेण्यासाठी अनेकांकडे गयावया करत होतं.

अशा शब्दांत तिनं त्या सेलिब्रेटींवर निशाणा साधला आहे. कंगनानं ज्यांचे नाव घेतले आहे. ती जोडी सध्याच्या घडीला प्रचंड लोकप्रिय आहे.

सोशल मीडियावर कंगनाती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तिनं अप्रत्यक्षपणे रणबीर कपूर आणि आलिया भट्टवर निशाणा साधला आहे. असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

पण रणबीर - आलीयाने कंगनाचे काय वाईट केले आहे, असा प्रश्नही तिला नेटकऱ्यांनी विचारला आहे. त्यांनी केलेलं लग्न हे कसे खोटे होते हे सांगण्याचा प्रयत्न कंगनानं केला आहे. 

आता कपूर कुटूंबात खरंच सगळं आलबेल आहे की, आणि जर आलबेल नसेल तर त्याचं कारण आलीया आहे का? याशिवाय नीतू कपूर यांनी ही पोस्ट लिहून अप्रत्यक्षपणे कंगनावर निशाणा साधलाय का? असाही सवाल नेटकरी विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

सोनी BBC अर्थने धर्मेश बरई यांचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव केला

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT