Kangana Ranaut, Javed Akhtar, Kangana Ranaut - Javed Akhtar Case Update News SAKAL
मनोरंजन

Kangana Ranaut ला धमकी दिली नव्हती तर हृतिकशी... ! Javed Akhtar यांचं कोर्टात स्पष्टीकरण

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात सुद्धा कंगनाने जावेद अख्तर यांचं नाव घेतलं होतं. अखेर कोर्टात जावेद अख्तर यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे.

Devendra Jadhav

Kangana Ranaut - Javed Akhtar Case Update News: गीतकार जावेद अख्तर यांनी अंधेरीतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर 2020 च्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात आपली बाजू मांडली.

जावेद अख्तर आणि कंगना रनौत यांच्यात मोठी खडाजंगी झाली. 2020 मध्ये कंगना रणौतने एका मुलाखतीदरम्यान जावेद अख्तरवर आरोप केला होता की गीतकार जावेद अख्तर यांनी तिला धमकी दिली होती.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात सुद्धा कंगनाने जावेद अख्तर यांचं नाव घेतलं होतं. अखेर कोर्टात जावेद अख्तर यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे.

(Did Not Threaten Kangana Ranaut, Suggested Her To Amicably Resolve Issues With Hrithik Roshan Javed Akhtar To Court)

त्याच दरम्यान जावेद अख्तर म्हणाले की, मी अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना राणौत यांच्यातील वाद प्रेमाने आणि समजुतीने सोडवण्याचा प्रयत्न केला होता.

हृतिक सोबतच्या भांडणात कंगनाने केलेल्या खंडणीच्या आरोपांना उत्तर देताना जावेद अख्तर यांनी हे विधान केले आहे.

कंगनाने तक्रारीत असं म्हटलं होतं की, जावेद अख्तर यांनी कंगनाला हृतिकची सार्वजनिक प्रतिमा डागाळल्याबद्दल माफी मागण्यास आणि हृतिकच्या बाजूने अनुकूल बोलण्यास सांगितले.

याशिवाय जावेद अख्तर यांनी मला धमकावले असा आरोप कंगनाने केला होता. याशिवाय जावेद अख्तरविरुद्ध आयपीसी कलम ३८३, ३८४, ३८७, ५०३, ५०६ आणि ५०९ अंतर्गत प्रक्रिया जारी करण्याची मागणी केली आहे.

कंगना रणौतने 2016 मध्ये हृतिक रोशनसोबतच्या तिच्या सार्वजनिक भांडणात जावेद अख्तरवर खंडणी आणि गुन्हेगारी धमकीचा आरोप करत तक्रार देखील दाखल केली आहे.

तिने दावा केला आहे की जावेद अख्तरने तिला आणि तिची बहीण रंगोली चंदेलला आपल्या घरी बोलावले होते आणि धमकी दिली.

9 सप्टेंबर 2021 ला, मुंबई उच्च न्यायालयाने अंधेरी न्यायालयासमोरील कार्यवाही रद्द करण्याची रणौतची याचिका फेटाळून लावली. या संपूर्ण प्रकरणावर जावेद अख्त्यार यांनी त्यांची बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT