DID Super Mom Winner esakal
मनोरंजन

DID Super Mom Winner: मजूरी करणारी वर्षा झाली 'डीआईडी सुपर मॉम'!

वर्षा विजयी झाल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. एका गरीब कुटूंबातून आलेल्या वर्षाच्या संघर्षाचं सोशल मीडियावर देखील कौतूक होतंय.

सकाळ डिजिटल टीम

DID Super Mom 3 Winner Varsha Bumrah: टीव्ही मनोरंजन विश्वात लोकप्रिय असणाऱ्या डीआयडी अर्थात डान्स इंडिया सुपर मॉमच्या स्पर्धेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आता या स्पर्धेमध्ये हरियाणाच्या वर्षानं विजेतेपद पटकावलं आहे. वर्षा बुमरा असे तिचे पूर्ण नाव असून ती घरकाम आणि मजुरी करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करते. वर्षा जिंकल्यानंतर तिच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या काही दिवसांपासून डान्स इंडिया डान्स सुपर मॉमची चर्चा होती. त्यात कोण विजयी होणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता होती.

वर्षा विजयी झाल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. एका गरीब कुटूंबातून आलेल्या वर्षाच्या संघर्षाचं सोशल मीडियावर देखील कौतूक होतंय. एवढेच नव्हे तर तिच्या विजयी झाल्याचा आनंद गावकऱ्यांनी देखील साजरा केला आहे. कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्हाला हवं ते मिळाल्यावाचून राहत नाही याचा प्रत्यय वर्षाकडे पाहिल्यावर येतो. डान्स इंडियाच्या शोमध्ये तिनं केलेल्या परफॉर्मन्सनं नेटकऱ्यांची पसंती मिळवली होती. वर्षा विजयी होणार यावर तिच्या चाहत्यांनी शिक्कामोर्तब केलं होतं.

हरियाणाच्या वर्षानं नेटकऱ्यांकडून कौतूकाची थाप मिळवली आहे. मजुरी करुन दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या वर्षानं काही झालं तरी या स्पर्धेमध्ये विजयी व्हायचंच असा चंग बांधला होता. अखंड मेहनत, कष्ट यामुळे ती यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. तिनं आता दहा लाख रुपयांचे विजेतेपद मिळवले आहे. वर्षाच्या मेहनतीला यश आले आहे. रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये वर्षाच्या परफॉर्मन्सनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

DID Super Mom Winner

इमारतींच्या बांधकामासाठी मजूर म्हणून काम करणाऱ्या वर्षाच्या यशानं नेटकऱ्यांना कमालीचा आनंद झाला असून त्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. वर्षाच्या विजयाचा आनंद त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊन साजरा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT