मनोरंजन

BBM 3: प्रेक्षकांची लाडकी सोनाली आहे प्रशिक्षित नेमबाज

मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी सीझन ३ ची स्पर्धक सोनाली पाटीलने तिच्या कोल्हापुरी लहेजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

युगंधर ताजणे

मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी सीझन ३ ची स्पर्धक सोनाली पाटीलने तिच्या कोल्हापुरी लहेजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण खुप कमी लोकांना माहित आहे की, ही अभिनेत्री एक प्रशिक्षित पिस्तूल नेमबाज आहे.मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी सोनालीने अमृतसर येथील अखिल भारतीय १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भाग घेतला असून ती ही स्पर्धा जिंकली आणि तिने पदकदेखील मिळवले.

बिग बॉस मराठीच्या एका एपिसोडमध्ये ती विशाल निकम आणि विकास पाटील यांच्याशी बोलत असताना, सोनालीने पिस्तूल नेमबाजी स्पर्धेबद्दल बोलताना दिसली. सोनालीने सांगितले की, जेव्हा तिने पदक जिंकले तेव्हा तिच्या वडिलांना खूप अभिमान वाटला होता. पण तिचा पहिला टीव्ही शो 'वैजू नं १' सुरू होण्यापूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले. आणि तिला याच गोष्टीचं वाईट वाटतं की तिचे वडील तिचे काम पाहू शकले नाहीत. सोनाली म्हणाली, "आज मला आणि माझं काम पाहण्यासाठी बाबा येथे असायला हवे होते, ते एकदम तंदुरुस्त होते,त्यांना कोणताही आजार नसताना, ते अचानक आम्हाला सोडून गेले."

सोनालीला 'वैजू क्रमांक १' आणि' घाडगे आणि सुन' या टीव्ही शोद्वारे प्रसिद्धी मिळवली. तिने 'साता जन्माच्‍या गाठी' या मालिकेत काम केलं होतं. नुकतचं ती झी मराठीच्या 'देवमाणूस' या मालिकेत दिसली होती. तसेच ती सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.सध्या ती बिग बॉस शोमधून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे आणि त्याचं मन जिंकत आहे. तिला तिच्या चाहत्यांकडून दाददेखील मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT