'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत 'जेठालाल'ची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांचे सेटवर सहकलाकारांसोबत वाद होतात, अशी सतत चर्चा होत आहे. अभिनेते शैलेश लोढा (तारक मेहता) आणि राज अनाडकत (टप्पू) यांच्याशी दिलीप यांचे वाद असल्याची चर्चा होती. या चर्चांवर दिलीप जोशी यांनी उत्तर दिलं आहे. गेल्या १३ वर्षांपासून या मालिकेचे कलाकार एकत्र काम करत आहेत. २००८ सालापासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Dilip Joshi on rumours of rift with Taarak Mehta Ka Ooltah Chashmah co stars slv92)
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलीप जोशी म्हणाले, 'आम्ही १३ वर्षांपासून एकत्र काम करत आहोत. जेव्हा सहकलाकारांसोबत वादाची चर्चा होते, तेव्हा मला खरंच हसायला येतं. सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही कथा तयार केल्या जातात. मला आता त्या गोष्टींवर स्पष्टीकरण द्यावंसं आणि सगळं ठीक आहे असं सांगावंसंही नाही वाटत. आमची टीम खूप चांगली आहे आणि म्हणूनच आमची मालिका चांगली चालतेय. माझ्या सहकलाकारांसोबत आणि संपूर्ण टीमसोबत काम करताना मला मजा येते. याचमुळे मी 'तारक मेहता..' सोडून दुसरं काही करायचा विचार करत नाही. माझी भूमिका आणि माझी टीम यातच मी समाधानी आहे.'
वेब सीरिजमधील ऑफर्स मिळाल्याबाबत ते पुढे म्हणाले, 'मला वेब शोसाठी अनेक ऑफर्स येतात. पण मी जेठालालच्या भूमिकेत खूश आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी भविष्यात इतर भूमिकांचा विचार करू शकतो. मात्र जेठालाल या भूमिकेमुळे मला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.