Dipika Chikhliya Tv entertainment Ramayan serial  esakal
मनोरंजन

Ramayan serial: 'तुम्हाला माता सीता समजायचो तू पातळी सोडली...' दीपिकावर नेटकऱ्यांचा संताप!

रामायणामध्ये सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका यांना तो व्हिडिओ शेयर करणे हे महागात पडले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ramayan Fame Sita Aka Dipika Chikhlia Bold Video : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले त्यामध्ये रामायण आणि महाभारत या मालिकांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. आता रामायण मालिकेमध्ये सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया या नेटकऱ्यांच्या रडारवर आल्या आहेत. त्यांना मोठया प्रमाणात ट्रोल देखील केले जात आहे.

९० च्या दशकांत रामायण आणि महाभारत या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. तो काळ टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील सुवर्णकाळ होता असेही म्हटले जाते. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांच्यातील धार्मिक वृत्तीची देखील जोपासना केली.

रामायण मालिकेमध्ये सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया यांना प्रेक्षकांचे, चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. अजुनही कित्येक चाहते त्यांना माता सीता म्हणूनच ओळखतात. मात्र आता त्या ट्रोल होत आहेत.

दीपिका या सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या सेलिब्रेटी आहेत. आपल्याकडे ज्या कलाकारांनी रामायण, महाभारत मालिकांमध्ये काम केले आहे त्यांची प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या मनातील ओळख थोडी वेगळी आहे. मनात अनेक वर्ष घर करुन असणाऱ्या त्या प्रतिमेला धक्का लागल्यास चाहते दुखावले जातात. हे दिसून आले आहे. यापूर्वी देखील कित्येक कलाकारांना त्याचा फटका बसला आहे.

Also Read - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

दीपिका यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यापूर्वी देखील त्यांनी एक व्हिडिओ शेयर केला होता. त्यावरुनही त्यांना नेटकऱ्यांना झापले होते. आताही त्यांनी बोल्ड अवतार शेयर केला आहे.

यामुळे चाहत्यांचा संताप झाला आहे. त्यांनी तर आमच्या मनातील तुमची सीतेची प्रतिमा मलिन झाल्याचे म्हटले आहे. तुम्ही पातळी सोडून वागलात. अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेयर करणं हा दीपिका यांचा आवडता छंद आहे. त्यामुळे त्यांनी तो व्हिडिओ देखील नेहमीप्रमाणे शेयर केला.

मात्र त्यामुळे नेटकऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आम्ही तुम्हाला ज्या रुपात पाहिले होते त्यापेक्षा तुम्ही फारच वेगळ्या आहात असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT