Dipika Chiklia on kriti sanon kissing controversy Esakal
मनोरंजन

Dipika Chiklia: 'आमच्या काळी नव्हत बाई असं काही..', किसिंग प्रकरणावर रामायणातील सिता क्रितीवर भडकली...

Vaishali Patil

सध्या मनोरंजन विश्वात रामायणावर आधारित 'आदिपुरुष' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच टिझर आणि ट्रेलर रिलिज झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. मात्र आता या चित्रपटाबाबत पुन्हा वाद सुरु झाला आहे.

दिग्दर्शक ओम राऊत आणि क्रिती सॅनन यांनी नुकतेच तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली होती. या मंदिराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे

या व्हायरल व्हिडिओमध्ये ओम क्रितीच्या गालावर किस करताना दिसला. हे पाहून चाहते संतापले आणि विविध कमेंट करू लागले.

मंदिराच्या परिसरात असं वर्तन शोभत का असे अनेक प्रश्न उपस्थीत झाले. आता याच दरम्यान रामानंद सागर यांच्या रामायणामध्ये सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिकलिया यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या प्रतिक्रियेमुळे आणखी नव्या चर्चांना उधाण आले आहे.

(Dipika Chiklia on kriti sanon kissing controversy)

दीपिका चिखलियाने स्वतः सीतेची भूमिका साकारली याबाबत त्या म्हणाल्या की, 'मी माझ्याबद्दल आणि आमच्या त्या काळाबद्दल बोलले तर त्या वेळी सेटवर आम्हाला आमच्या नावाने हाक मारण्याचं धाडस कोणी केले नाही.

मला चांगलं आठवतंय की आम्ही आमच्या भूमिकेत असताना अनेकदा लोक येऊन आमच्या पाया पडत असत. तो काळ वेगळा होता. आम्ही कुणालाही मिठी मारू शकत नव्हतो, किसींग तर लांबच आहे.

पुढे त्या म्हणतात की, आजच्या कलाकारांनी हे समजून घ्यायला हवं की जेव्हा आपण अशा प्रकारच्या भूमिका करतो तेव्हा लोक आपल्याला देव मानतात. कृती ही आजच्या पिढीची अभिनेत्री आहे.

आजच्या युगात कोणाचे चुंबन घेणे किंवा मिठी मारणे हा एक गोड हावभाव मानला जातो. तिने स्वतःला कधीच सीताजी मानले नसेल. तो भावनांचा विषय आहे.

मी सीतेचे पात्र जगले आहे तर आजची अभिनेत्री त्याला फक्त भूमिका मानतात. चित्रपट किंवा प्रोजेक्ट संपल्यानंतर त्यांना आता काही फरक पडत नाही.

प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा 'आदिपुरुष' 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT