pravin tarde 
मनोरंजन

व्हिडिओ: संगीतकार भिडेंच्या निधनानंतर प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ४७ वर्षांचे होते. गुरुवार १० डिसेंबर रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘देऊळ बंद’, ‘पाऊलवाट’ अशा अनेक मराठी सिनेमांमधील गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होतेय. अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्यासारखी व्यक्ती पुन्हा होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रवीण तरडे यांनी भलीमोठी पोस्ट लिहित त्यांचं दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी लिहिलंय, “देऊळ बंद, 'मुळशी पॅटर्न' आणि आता 'सरसेनापती हंबीरराव'. संगीतकार नरेंन्द्र भिडे, माझा हक्काचा एकुलता एक संगीतकार गेला. 'ऊन ऊन वठातून', 'आभाळा आभाळा', 'अरारारा खतरनाकऽऽऽऽऽ' आता पुन्हा होणे नाही. तीन वर्षांपूर्वी त्यांना ज्या दिवशी चाल सुचली तो दिवस…” असं म्हणत प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

'आरारारा खतरनाक' या गाण्याची चाल तयार करतानाचाही एक व्हिडीओ तरडे यांनी यासोबत शेअर केला आहे.संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी सिनेमे संगीतबद्ध केले होते. त्यांनी महम्मद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. तर, हेमंत गोडबोले यांच्याकडे त्यांनी पाश्चिमात्य संगीताचं शिक्षण घेतलं होतं. नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, सिनेमा, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

director actor pravin tarde share video in the memories of late film score composer narendra bhide  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT