director hemant dhome post about clash jhimma 2 with animal dunki salaar sam bahadur SAKAL
मनोरंजन

Jhimma 2: "आपल्या ‘झिम्मा २’ चा सगळा लढा...", बॉलिवूडच्या गर्दीत मराठी चित्रपटाला बघून हेमंतची पोस्ट चर्चेत

हिंदी सिनेमांच्या गर्दीत हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय

Devendra Jadhav

सध्या सिनेरसिकांना विविध सिनेमांची पर्वणी मिळतेय. बॉलिवूडमध्ये 'सॅम बहादूर', 'अॅनिमल' अशा अनेक सिनेमांची चांगलीच चर्चा आहे. अशातच आज शाहरुख खानचा 'डंकी' आणि प्रभासचा 'सालार' सिनेमा रिलीज झालाय.

असा हिंदी सिनेमांच्या गर्दीत एक मराठी सिनेमा गेले अनेक आठवडे टिकून आहे. तो म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा 2. झिम्मा 2 बद्दल हेमंत ढोमेने एक खास पोस्ट लिहीली आहे. काय म्हणाला हेमंत जाणून घ्या.

(director hemant dhome post about clash jhimma 2 with animal dunki salaar sam bahadur)

हेमंतने गोरेगाव येथील मूव्ही टाईम हब या सिनेमागृहाच्या बोर्डचा फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करुन हेमंत लिहीतो, "आपल्या ‘झिम्मा २’ चा सगळा लढा, सारं यश या फोटोत आहे…
५ व्या आठवड्यात पदार्पण करत असताना आपल्या सिनेमाने या बलाढ्यांसोबत उभं ठाकून आपला असा हक्काचा प्रेक्षक चित्रपटगृहात आणला आणि त्यांना आनंद दिला!"

हेमंत शेवटी लिहीतो, "अजून काही वर्षांनी हाच फोटो बघून चेहेऱ्यावर समाधानाचं हसू असेल!
अनेक साऱ्या आठवणींचा साठा असेल, आपण केलेल्या कामाचं समाधान असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड अभिमान असेल! बास अजून काय पाहिजे?याचं सगळं श्रेय तुमचंच… तुम्हीच कर्ते करविते! खूप खूप धन्यवाद!"

एकूणच हिंदी सिनेमांच्या गर्दीत एखादा मराठी सिनेमा थिएटरमध्ये यशस्वीरित्या टिकणं ही सर्वांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट म्हणावी लागेल.

बॉलिवूडचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2' पाचव्या आठवड्यातही प्रेक्षकांचं हाऊसफुल्ल प्रेम मिळवत आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT