kunal 
मनोरंजन

दिग्दर्शक कुणाल कोहलीलाही कोरोनाचा फटका, घरातील सदस्याचा कोरोनामुळे मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे देशभरात हाहाकार माजला आहे. अशामध्ये अनेक जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अनेक कलाकारही या कोरोना विषाणूपासून काही चुकलेले नाहीत. बोनी कपूर यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला. तर दुसरीकडे अभिनेते किरण कुमार यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे नसताना त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बॉलिवूडकरांनाही कोरोनाचा सामना करावा लागत आहे. आता दिग्दर्शक कुणाल कोहलीलाही कोरोनाचा फटका बसला आहे. 

कोरोनामुळे कुणालच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. कुणालने स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. कुणालची मावशी जवळपास आठ आठवडे कोरोनाशी लढा देत होती. मात्र अखेरीस तिचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्युमुळे कुणालला आणि त्यांच्या कुटुंबियांना फार मोठा धक्का बसला आहे.

'आठ आठवडे कोरोनाशी लढल्यानंतर शिकागोमध्ये वास्तव्यास असणाऱ्या माझ्या मावशीचे निधन झाले. माझं कुटुंब फार मोठं आहे. आमची एकमेकांशी फार जवळीक आहे. मात्र आताच्या परिस्थितीमध्ये आम्ही एकत्र नाही. मावशीच्या अशा सोडून जाण्याने मला फार दुःख होत आहे.' असे ट्विट कुणालने केले आहे. 

कुणालने ट्विटरव्दारे आपलं दुःख व्यक्त केलं आहे. कुणाल पुढे म्हणतो, माझ्या मावशीची मुलगी नेहमी माझी मावशी ज्या रुग्णालयात होती त्या रुग्णालयाच्या पार्किंग परिसरात कारमध्ये बसून राहायची. कारण रुग्णालयात इतर कोणास जाण्यास परवानगी नव्हती. आपल्या आईच्या सुरक्षिततेसाठी ती सतत प्रार्थना करत राहिली. तसेच कुणालने त्याच्या कुटुंबियांचे जुने फोटो देखील त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. 

कुणालच्या आईला पाच बहिणी. या साऱ्यांचे फोटो त्याने शेअर केले आहेत. बहिणींमधील नातं काही वेगळंच असतं. हे नातं कधीच तुटू शकत नाही. असेही कुणालने म्हटले आहे. कुणालने त्याची आई आणि मावशीच्या आठवणीदेखील सांगितल्या आहेत. मावशी माझ्या कायम आठवणीत राहोल असंही त्याने म्हटले आहे. 

director kunal kohli maternal aunt died because of corona virus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT