दिग्दर्शक विजू माने (viju mane) यांनी सध्या सर्वांना हसवण्याचा विडा उचलला आहे. पांडू सिनेमातून त्यांनी ते सिद्ध केलंच शिवाय 'स्ट्रगलर साला'चा तिसरा सीजन देखील त्यांनी सुरू केला आहे. ते अनेकदा सामाजिक, राजकीय किंवा मनोरंजन विश्वातील घडामोडींवर व्यक्त होत असतात पण आज त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या विषयी लिहिले आहे. एकनाथ शिंदे आणि विजू माने यांचे संबंध फारच निकटचे आहेत. पण यंदाच्या गणपतीची एक खास आठवण विजू माने यांनी सांगितली आहे.
(director viju mane shared post about cm eknath shinde after he visit his home for ganpati darshan)
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला जात आहेत. नुकतीच त्यांनी दिग्दर्शक विजू माने यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर विजू माने यांनी एक पोस्ट लिहिली आहे. विजू म्हणतात, 'खरंतर माझ्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला दरवर्षी ते येतात. पण यावर्षी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते त्यामुळे मनात कितीही वाटत असलं तरी ते येतील का याबद्दल शंका होती. पण खरंच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे माझ्या घरी आले. मनमोकळ्या गप्पा मारल्या. सोबत खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते, आमचे मित्र नरेश म्हस्के हेसुद्धा होते (दरवर्षी प्रमाणे).'
खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी देखील कितीही उशीर झाला तरी माझ्या घरच्या बापाचं दर्शन घेण्याची आपली सवय मोडली नाही. ( मला चांगलं आठवतंय गेल्यावर्षी रात्री दीड वाजता खासदार माझ्या घरी आले होते. आणि तेव्हाही जवळपास अर्धा तास अत्यंत छान चर्चा झाली होती.)
.... प्रत्येक जवळच्या माणसाच्या, कार्यकर्त्याच्या....खरंतर आमंत्रण देणाऱ्या कुणाच्याही घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे ही स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेली शिकवण आहे...
राजकारणातील उलथापालथ हा प्रत्येकाच्या चर्चेचा आवडीनिवडीचा विषय असतो. पण आपल्यासाठी तो माणूस महत्त्वाचा असतो जो आपल्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेला धावून आलेला असतो. माझ्या बाबतीत मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे ते स्थान आहे. आणि मी कृतज्ञता (मराठीत gratitude) व्यक्त करण्याला कायम प्राधान्य देणारा माणूस आहे. मला शक्य तेव्हा, शक्य तिथे, शक्य त्या कार्यक्रमात मी त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानत असतोच. या शिवाय गेली अनेक वर्ष मी त्यांना ओळखतोय. सामान्य माणसात मिसळून धडाडीने काम करण्याचा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांच्या धाडसाची बरोबरी करू शकेल असा एकही नेता मी पाहिलेला नाही.
'महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली त्यावेळी पुरात उतरून त्या रेल्वेत पोहोचून प्रवाशांना धीर देणे, सांगली कोल्हापूरच्या पुरात अगदी खांद्याइतक्या पाण्यात उतरून पूरग्रस्त लोकांच्या जवळ जाऊन त्यांना मदत करून भविष्यासाठी आश्वस्त करणे आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे ज्याकाळी माणूस शिंकला तरी पाचावर धारण बसायची अशा काळात पीपीई किट घालून स्वतः करोना रुग्णांना आधार द्यायला त्यांच्या प्रत्यक्ष जवळ पोहोचणारे नेते किती होते हे आठवून पहा.मी आणि माझा मित्र संदीप वेंगुर्लेकर आम्ही नेहमी म्हणतो, "तसं पाहिलं तर आपल्याला सगळेच राजकारणी सारखेच. अनेक पक्षातल्या अनेक नेत्यांशी छान संबंध आहेत. राजकारण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असावं पण सन्मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ह्या माणसात अशी काहीतरी जादू आहे की त्यांच्यासाठी आपण 'काहीही' करू शकतो.' अशी पोस्ट माने यांनी लिहिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.