Disha Patani was going inside the airport without ID  
मनोरंजन

Disha Patani : 'मॅडम ID कार्ड प्लीज'! दिशा भरकटली, सुरक्षारक्षकानं परत पाठवलं

दिशा ही बॉलीवूडमधील फिटनेस फ्रीक म्हणून ओळखली जाते. तिला इंस्टावर फ़ॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

युगंधर ताजणे

Disha Patani was going inside the airport without ID : प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी ही आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिच्याबाबत विमानतळावर घडलेला तो प्रसंग. सोशल मीडियावर दिशा ही नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेचा विषय असते. त्यावरुन तिला आलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट असतात.

दिशा ही बॉलीवूडमधील फिटनेस फ्रीक म्हणून ओळखली जाते. तिला इंस्टावर फ़ॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. दिशाच्या बाबत घडलेला तो प्रसंग अनेकांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. तिला विमानतळावर सुरक्षारक्षकानं हटकल्याचे दिसून आले. तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची चर्चाही होत आहे.

सुरक्षारक्षकानं दिशाकडे आय़डी कार्डची मागणी केली होती. तिनं तो न दिल्यामुळे तिला सुरभारक्षकानं पुन्हा पाठवून दिलं. कारण तिच्याकडे ओरिजनल कुठलेही डॉक्युमेंट नव्हते. दिशानं सुरक्षारक्षकाला फोनमधून आयडी कार्ड दाखवले होते. मात्र पुढे तिला विमानतळ सुरक्षारक्षकांनी रोखले. आणि तिल ओरिजनल आधार कार्ड दाखविण्याची विनंती केली.

त्या व्हिडिओमध्ये दिसून येते की, तिच्याकडे कोणतेही बॅग नाही. ती तिच्या स्टाफकडे बॅगची मागणी करते. आणि कारकडे जाते. तिथून ती तिचे ओरिजनल आधार कार्ड घेऊन येते. त्यानंतर तिला इंट्री दिली जाते. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT