Disha-Tiger’s relationship been a one-sided love affair? Google
मनोरंजन

Tiger Shroff वर एकतर्फी प्रेम करायची दिशा? अभिनेत्रीची जुनी मुलाखत चर्चेत

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांनी तब्बल सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ब्रेकअप केलं ही बातमी सध्या वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आहे.

प्रणाली मोरे

(Bollywood) बॉलीवूडमधनं आलेल्या एका ब्रेकअपच्या(Breakup) बातमीनं सगळ्यांनाचा मोठा धक्का बसला. टायगर श्रॉफ(Tiger Shroff) आणि दिशा पटानी(Disha Patani) यांनी तब्बल सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ब्रेकअप केलं आहे ही सध्याची मोठी बातमी म्हटलं जात आहे. अर्थात, दोघांनी अनेक ठिकाणी कामाव्यतिरिक्तही एकत्र दिसल्यानंतर कधीच आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. त्यांनी या नात्याचा कधी स्विकारही केला नाही,ना त्या नात्याला नकार दिलेला कधी पाहिला. फक्त त्या दोघांच्या अनेक ठिकाणी एकत्र दिसल्यामुळे चाहत्यांनी ते डेट करत आहेत असा इतकी वर्ष अंदाज बांधला होता. (Disha-Tiger’s relationship been a one-sided love affair?)

मालदीव मध्ये दोघं एकत्र सुट्टी एन्जॉय करायला देखील गेले होते. त्यावेळी त्यांच्यात जवळीकता वाढतेय असं देखील म्हटलं गेलं होतं. मात्र यादरम्यान एक बातमी कानावर पडतेय की दिशा पटानीचं टायगर श्रॉफवर एकतर्फी प्रेम होतं. टायगरने कधीच आपल्या प्रेमाची कबुली तिला दिली नव्हती.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिशा-टायगरशी जवळून परिचय असलेल्या सूत्रानं माहिती दिली आहे की, दोघे खूप वर्षांपासून चांगले मित्र होते. पण टायगरचं सर्वात जास्त लक्ष स्वतःच्या फीटनेसवर ,करिअरवर राहिलं,आहे. आयुष्यात इतर गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. तो दिशासोबतच्या नात्याविषयी खूप क्लिअर होता. दिशा मात्र विचार करत होती की काळ सगळ्या गोष्टी बदलून टाकेल, टायगरचं मत बदलेल, पण तसं झालं नाही. एकतर्फी प्रेम नेहमीचं खूप त्रासदायक ठरतं. दोघांच्या मध्ये यावेळी खूप टेन्शनचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात काही ठीक सुरू नव्हतं. अशामध्ये दोघांनी एकमेकांपासून लांब राहणं,वेगळं होणं योग्य समजलं आहे. दोघांसाठी हाच निर्णय कदाचित योग्य असेल. शेवटी एकतर्फी प्रेम आयुष्याचं मोठं नुकसान करतं. जे कुणासाठीच चांगलं नाही.

टायगर आणि दिशाने कधीच आपल्यातील नात्याचा स्विकार केला नाही. तिनं एका मुलाखतीत मात्र श्रॉफ कुटुंबाची खूप प्रशंसा केली होती. तिनं म्हटलं होतं, टायगर आणि माझ्यात खूप घट्ट नातं आहे पण त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. सोशल मीडियावर उगाचच आमच्या नात्याविषयी नको त्या गोष्टी बोलल्या जातात. आम्ही एकत्र अनेक ठिकाणी कामाव्यतिरिक्त वेळ घालवली की लगेच त्याची बातमी बनते. दिशा इतकंही बोलली होती की श्रॉफ कुटुंबाव्यतिरिक्त माझे इंडस्ट्रीत कुणीही दुसरे मित्र नाहीत. हे कुटुंब खूप पाठिंबा देतं मला. टायगर आणि त्याच्या कुटुंबासोबतच्या माझ्या मैत्रीमध्ये मी खूप खूश आहे.

जॅकी श्रॉफ यांनी देखील टायगर-दिशाच्या ब्रेकअपवर थेट न बोलता भाष्य केलं आहे की,मला माहीत नाही भविष्यात ते त्यांच्या नात्याला काय नाव देऊ इच्छितात. त्यांच्या मते,टायगर नेहमी त्याच्या कामाप्रती खूप डेडिकेटेड राहिलाय. तो सध्या कामावरच लक्ष केंद्रित करत आहे,ते त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. पण दिशाविषयी देखील चांगलं मत जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केलं आहे. आता खरंच दिशा एकतर्फी प्रेमात होती की हा देखील फक्त अंदाज हे काही दिवसांत स्पष्ट होईलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT